Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
छ २० रोजीं दीड प्रहर दिवस येतां कूच जालें. बराबर बाबा उपाध्ये व श्रीमन शास्त्री व नारायन बाबा चत्रफुले वगैरे शावकारमंडली येकोबा नाईक पिदडी व मुऱ्हार नाईक गडकरी व गंगाजी नाईक गडकरी व दरगदार बलवंतराव भवानी व चिटणिसाकडील शामराव चीटणीस व फडनिसाकडील कारकूण व खासगीकडील सितारामपंत व मुनीकडील कारकूण याजप्रमाणें बंदोबस्त करूण दिल्हा. व बराबर पतक रघुनाथराव मुढे व पाटोळे दोघे मिलोन स्वार पाचसे व चवकी पाहाऱ्यास येक कुंपणी गारद्याची दिल्ही वगैरे सईनाधुरंधर याच्या घरपागा वगैरे लोक मिळोन दोन हजार व हाती पंधरा व बानाच्या कैच्याचे उट पंधरा व येत्राबराबर पाच हजार आहे. दीड प्रहर दिवस आल्यावर कूच जालें. सईनासाहेब गोटाबाहेर घालवून डेऱ्यास आले. यावर भवानी दादू यास बोलावून वस्त्र शेला पागुट्ये पेठणी व मलमलीचा झगा व पायजमा येकूण साडेतीन सनगे दिल्ही व घोडी येक दिल्ही. नंतर सदासिव राजाराम यास सेला पागुटें पेठणी दिल्हे, व घोडी येक दिल्ही व हाती येक कटकांत देवविला, आन त्याचें काम त्यास, सांगितलें, नंतर विडे देऊन बिद्यागिरी केली. यावर यात्रेंत त्यांना घालून दरगावर आले. च्यार घटका दिवस होता. तेथें नदी आहे. आपण व कारभारी बसून तेथून माघारी. च्यार कोस कबडू पाटील याचा बाद आहे तेथील मुकाम नेमून दरबार बरकास जाला. छ २१ रोजीं प्राथकालीं श्नान देवपूजा करूण भोजेन जाले. सवा प्रहर दिवस येतां नागपूराकडोन डाकची पत्रें आली. यावर कारभारी बोलाऊन पत्रें वाचून पाहिली. दीड प्रहर दिवस येतां कुच जालें. प्रहर दिवस राहतां मुकाममजकुरी दाखल जाले. यावर दोन घटका डेऱ्यास बसून, कारभारी बोलावून, आपण व परसोजी भोसले व उभयतां कारभारी वगैरे मानकरी येस तबवावर जाऊन, तोफा दोन बोलाऊन, तळ्यांत गोळे दाहा टाकले. नंतर साहेंकालीं श्वारी डेऱ्यास आली. यावर आपण व उभयता कारभारी व परसोजी भोसले यैसे बसून, दोन घटका बोलून, मुकामाचा गाव पाच कोस चांदगढी नेमून, दरबार बरकास जाला. छ २२ च्यार घटका दिवस आल्यानंतर श्वान देवपूजा करूण, भोजेन करूण, पावने दो पाहारा कूच जालें. तों साहा घटका दिवस राहतां मुकाममजकुरी दाखल जालें. नंतर दोन घटका डेऱ्यास बसून, श्वारी तयार करूण, आपण व उभयेता कारभारी वगैरे मानकरी यैसे तेथून येका कोसावर सिवनगावचा तलाव आहे तेथें गेले. नंतर तेथे जाऊन दोन घटका तलाव पाहून दोन घटका रात्रीस श्वारी डेऱ्यास आली. यावर आपण व उभयता कारभारी व पांडुरंग गनएश व बापू हाळ्या व बाळाजी पंत काळेकर यांच्या मारफतीनें कमावीसदार आहेत त्यांस प्रगादार कोण्ही भेटावयास आले नाहीत, याजकरीतां म॥रनिले याजवर बहुत रागे भरले होते. मग आपण व कारभारी बसून तेथून साहा कोसावर तई ह्मणून गांव आहे. तेथे मुकाम नेमून दरबार बरकास जाला. छ २३ रोजी प्रथकाली आपण व परसोजी भोसले यैसे बसून, कारभारी बोलावून, बकरदसिंग सिकाकूर राजदरबारी यास पत्रें लेहून साडनीस्वार रवाणा केला. नंतर श्नान देवपूजा करूण, भोजेन करून, दीड प्रहर दिवस येतां कुच जालें. आन आपण चांदगढीचा किला पहावयास गेले. किलेदारांनी हि बैठक केली होती. तेथें दोन घटका बसून विडे घेऊन कुच केलें. च्यार घटका दिवस राहतां मुकाम मजकुरीं दाखल जाले. नंतर तेथें नदीत आपण व कारभारी बसून च्यार घटका दिवसापासोन च्यार घटका रात्रपरयंत गवई याचे गायेन जालें. नंतर आपण व कारभारी बसून तेथून आठाकोसावर क॥ देवनीचा मुकाम नेमून डेऱ्यास आले. दरबार बरकास जाला. छ २४ रोजी गावची रयेत फिरयाद आली होती. त्याजवऱ्होन मर्जी दिक्क होती. प्रहर दिवस आल्यानंतर श्नान देवपूजा करूण, भोजेन करून, दीड प्रहर दिवस येतां कुच जालें, तों तीन घटका दिवस राहता मु॥ मजकुरी दाखल जाले. बालाजीपंत काळेकर याजकडे कमावीस आहे त्यानें डेरे किल्यांत दिल्हे. मग मारनिले याजवर रागे भरले कीं, आवघे लशेकर व घोडी बाहेर राहिली आन आह्मी किल्यांत राहिलों. ह्मणोन च्यार घटका रागे भरोन, कारभारी बोलावून,आपण व उभयेता कारभारी बसून, येक प्रहर बोलने जालें. नंतर दरबार बरकास जाला. छ २५ रोजी प्रथकालीं कराभारी बोलाऊन मातोश्रीस व सईनाधुरंधर यांस पत्रें लेहून डाक रवाणा केली.