Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)

श्रीवरद.

लेखांक १९.

१७०३ ज्येष्ठ शुद्ध ६.

पु॥ श्रीमंत राजश्री नाना स्वामीचे सेवेसी :-
विनंतिपत्रीं आज्ञा कीं, इंग्रजासीं बिघाड करून मसलत कर्णें. तेव्हां शिखासी बिघाड करावयाचा नव्हता. जाला असो. हालीं हरवजेनें शिखास सामील करून घ्यावें, ही मसलत फार चांगली. जरूर लिहिल्याप्रमाणें अमलांत यावें. इंग्रजांचें पारपत्य केल्याखेरीज पातशाहींत कोणास चैन पडणार नाहीं, हें पुर्ते समजावें. याप्रमाणें बोलावें, म्हणून लिहिलें. त्यास आपले आज्ञेप्रमाणें यांशीं भाषणें केलीं व लिखित केले. याणींहीं पूर्वी गजपतसिंग जाट यास सजामुफीखान याची फशैज कुंजपुरियाकडे आहे येथें धरून कैद केलें, याचा तपसील पूर्वीच विनंतिपत्रीं पाठविला होता. त्यास हालीं नजबखान याणीं गजपतसिंगास दिल्लीस बोलावून आणून, सा लक्षाचा मागला फडशा करून त्यास वस्त्रें व शिरपेंच, झालरदार पालखी याप्रों बहुत सन्मान करून, पुत्रास व त्याचे कारभारी यांस व भावाबंदास यथायोग्य वस्त्रें देऊन बोळवण्यांत आणिलें कीं शिखाचा मुलूक आहे तो शिखाकडे असावा आणि त्याणीं व तुह्मीं आपले फौजेनिशीं सामील असावें. ह्मणून पक्केपणें बोलून त्यास छ १५ रजबी रुकसत करून कुंजपुरियाकडे मार्गस्त केलें. व यापूर्वी जाबेत-खानासही छ ५ माहे मारीं याच कार्यानिमित्त रुकत केले. ते गासगडास गेले आहेत. त्यास जाबेत-खान व गजपतसिंग एकत्र होवून, शिखाशीं सलूख करून, तिकडील फौज मिर्जा सफीखान सु।। रिकामी करून अंतर्वेदीत मेरट प्रांतीं छावणी करावी हा विचार ठरला आहे व तोफखान्याचीही तयारी आहे. बादजबरसात पातशहा सा। बाहेर निघतों, ह्मणोन, आह्मांसी बोलतात; परंतु काबूचा रंग पाहून आहेत. अमलांत येईल तें मागाहून विनंति लिहूं. कृपा केली पाहिजे. दर्शनलाभ होई तो सुदीन. हे विनंति.