Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)

श्री.

लेखांक १४९.


१६९८ चैत्र वद्य ५.

राजश्री लक्ष्मण आपाजी गोसावी यासि:-
सु॥ सीत सबैन मया व अलफ. अपटणाचीं पत्रें सरकारांत करनेल कीटिंग यास हालीं आलीं. त्यांचा भाव पहिल्या लिहिण्यावर सक्तता असे. हालीं नरम भाव लिहिले आहेत जे, आपण तह केला याचा प्रकार कलकत्त्येवाले यांच्या हुकुमाप्रमाणें केलें असे. त्यास, आपणास तूर्त तुमची कुमक करू नये व बारभाईची कुमक करू नये. त्यास, तूर्त तुम्ही हरयेक कोणी मोगल अगर भोसले आपले कुमकेस आल्यास आणावे. यांत आमचा आग्रह नाहीं. आह्मांस विलायतेचा हुकूम आला म्हणजे आम्ही आपली कुमक करूं, विलायतेचा हुकूम, आपणच कुमक करावी, ह्मणून येईल, बारभाईंची कुमक करावी, असा येणारच नाहीं. आह्मीं बारभाईंची कुमक करणार नाहीं. तूर्तचा प्रकार जाहाला. त्यांत तूर्त इंग्रजी कुमक आहे, तो सरंजाम माघारा नेववावा, हें मात्र ठरविलें आहे. यांत आम्हांवर रोष नसावा. कलकत्त्याच्या हुकमावरून करावें लागलें. याप्र॥ हाली नरम-पणाचे लिहिणेयांत भाव आहेत. म्हणून करनेल यांनीं निवेदन केलें व सरकारांत पत्रही आलें. त्यास, करनेल तेथेंच जात आहे. याचा भाव तेथें तुम्हीं मनास आणावा. तेथील कोशलदार वगैरे इंग्रजांस समजला असेल. त्यास, तेथील शोध करून लिहून पाठविणें. छ १९ सफर. मंगळवार पंचमी, प्रात:कालच्या ६ घटिका दिवस.

(लेखनावधि:)