Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)

श्रीशंकर.

लेखांक ११३.

१६९७ मार्गशीर्ष शुद्ध १४.

राजश्री आण्णा स्वामीचें सेवेसी :-
विनंति. आपणास कळावें ह्मणून विस्तारें दोन बंद लिहिले आहेत. आपण देशांतीलहि साधनें केलीं. अपाजी साबाजीची खातरजमा करून रवाना केले. फार उत्तम जालें ! आण्णा ! हरतऱ्हेनें तूर्त मसलत सेवटास न्यावी, हेंच लक्ष लागलें आहे. आपणही त्या प्रेत्नांत आहेत. सारांश, हरतऱ्हेनें जनरालास पलटवर आणावें. कोपशदार व जनराल कोपीन त्यांचीही पातशहा आदिकरून सर्वांची इच्छा तृप्त करावी. परंतु आपली मसलत सेवटास न्यावी. हें लक्ष जाते समईं कितेक प्रकारें तुह्मांसी बोलिलों आहों. सारांश, अण्णा ! हरतऱ्हेनें लढाई सुरूची परवानगी येई ते गोष्ट करावी. रात्रंदिवस ध्यास तुह्मांकडे आहे. गायिकवाडाची कुलकट व कोणाचे कोण हें पहावयाचें तरी गोविंदरावानीं xxxxxxxxxxले. ते गंभीराजवळ कारकूनच राहिल्यामुळे xx ले. त्याची नक्कल आह्मांजवळ होती ते पाठविली आहे. त्यावरून सर्व ध्यानास येईल. तूर्त आपली मसलत साधे ते गोष्ट करावी. तुह्मांकडे निजध्यास लागला आहे. मेस्त्र इष्टोर इंग्रज कितेक आह्मासी उमेदीच्या गोष्टी सांगून गेले आहेत. रामसिंग त्याजपासीं आहे. त्याजला बलावीत जावें आणि यादीप्रें।। वस्तावनी जिन्नस देईल तो मागावा आणि इष्टोलापासीं तरवार येथें होती. आह्मी मागत होतों. त्यास चुकोन समागमें गेली. सईफ आहे ते तरवार जरूर रामसिंगास सांगून मागावी. आरबी एक घोडा चांगला आह्माकरितां त्यास सांगावा. परंतु तरवार रामसिंगास ठावकी आहे. येथें आह्मीं मागितली. तेव्हा मेस्त्र होमास दिली, म्हणून सांगितलें. परंतु येथें कोणाही इंग्रजाजवळ तरवार राहिली नाहीं. सर्वांचें सांगणें कीं मेस्त्र इष्टोलानींच माघारीं नेली आहे. त्याजवरून हें पत्र लिहिलें आहे. तरी ते तरवार ठिकाणीं लाऊन आणऊन पाठवणें. एक घडयाळ जबाबी चांगलें, जबाबी म्हणजे तास वाजतात तें जरूर त्याजला सांगून मागवावें आणि जिन्नस येईंसे करावें. आपण तेथें आहेत. कुटुंब आणविलें, म्हणून ऐकलें. फार उत्तम जालें. परंतु इकडील काळजी मात्र राखावी. आह्मी येथें सारी आणली ती मागती सुरतेस पाठवितों. तुमची परवानगी पुढें चालावयाची आली, ह्मणजे लाऊन देतों. वरकड वारंवार श्रीमंतांचीं पत्रें आपणास जातात. आह्मी लिहितों न लिहितों सर्व तुह्मांस माहीत आहे. तेव्हां वारंवार काय ल्याहावें ? आबा सरदाराकडे गेले होते. त्यांचीं वचनेंप्रों घेतलीं आहेत. सर्वांची नजर इंग्रजांचे अनकुलतेवर आहे. आबा गेलियानीं इतकें मात्र जालें जे सरदार दोघे सिंदे होळकर तिकडे जात नाहींत. तूर्त राहून, इंग्रजसह श्रीमंत आले तरी खानदेशांत येऊन मिळतात. ऐसेंच वचन घेऊन आबा येणार. गोविंदरायाकडील घडेलसें फार केलें. परंतु घडलें नाहीं. त्याचे मूळ व फळ तरी खामका येईल. नारोपंत येथें आहेत. मर्जीचे वगैरे सर्व ध्यान आहे तेंच आहे. देशांत तुह्मी केलें त्याचे व इकडील साधन जें पडेल तें पाडावें. येथेंही खटपट करीत आहों. खर्चाची मोठी ओढ आहे. कर्जवाम तरी दोन चार लाख मिळेसें करावें. हैदराकडील ऐवज मुंबईस आला आहे तोही सत्वर पाठवावा. दारू, सिसें व बंदुका एकंदर जरूर पाठवाव्या. लडाई सुरू जाली ह्मणजे इष्टोलास जरूर पाठवावें. परवानगी घ्यावी. आपण तेथें आहेत. प्रसंग पाहून करणें तें करावें. केवळ येथील अर्थ तुह्मांस सर्व माहीत आहेत. वारंवार ल्याहावें, ऐसें नाहीं. गोविंदरावबावाकडील देवळाचे संबंधाचा ऐवज हजार रुपये घेऊन पाठविता. त्यांचें कार्य बनविल्या मनोदयानुरूप अण्णा ! सर्व घडेल. चिंता नसावी. बनेल तैसें करावें. रां। छ १२ सवाल. बहुत काय लिहिणें ? हे विनंति.