Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्री.
लेखांक ११२.
१६९७ मार्गशीर्ष शुद्ध ७.
सर्व मसलतीचा जिम्मा आपला आहे, तेव्हां कमकसर आपणच ध्यानांत आणावें. मसलतीचा मोहरा माघार फिरविल्यानें लौकिकांत शौरत कैसें होईल ? व येणार नाउमेद होतील, ते फिरोन पल्ल्यावरी यावयास बहुत भारी पडेल. सबब आजी जलदीनें जबाब पाठवावा. येथपर्यंत आल्यानीं शत्रूवर बहुत दाब पडोन हतवीर्य जाहले आहेत. भोडगांवपर्यंत गेल्यानीं लढाईखेरीजच मसलत सुधरत आहे. आमचा भार सर्व आपणावर; तेव्हां ज्यांत या मसलतीचा उपयोग पडे, तेंच करावें; आणि येथील सरदारांत एकंदर परवानगी किरकोळ कामें दबावानीं होतील तीं करीत जावी ह्मणून व खानदेशांत जाण्याची परवानगी जरूर पाठवावी. इज्यानेब फौजसुद्धां व आपला सरंजाम तयार असलियानें फितुरी नाउमेद होऊन जमणार नाहींत, शरणच येतील. आणि एक जागा आपले माहालांत मुक्काम करोन राहिलों तरी आपले आमचे येक लासांत दरज पडलो, ऐसें समजाऊन उमेदवार होतील. याजकरितां पुढें चाललियानें सोय आहे. बहुतेक कामें जालियांत आहेत. इंग्रेजी सामान न लगतांहि स्वारी बराबर देशीं असलें ह्मणजे फितुरी सहजांत दाबानेंच फुटोन जातील. मुकाबल्यास यावयाचें होणार नाहीं. आह्मास सुचलें तें लिहिलें आहे. जसें तुमचे विचारें ठरेल तसेच अमलांत येईल. कोणेविसीं दुराग्रह नाहीं. परंतु चिखलीकडे गेल्यास मनसुब्यास वांकडें पडतें. सबब तपसीलवार लिहिलें आहे. उत्तर पाठवावें. कारनेलीस हुकूम पाठवावा. छ ३ सवाल.