Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्री.
लेखांक ११०.
१६९७ मार्गशीर्ष शुद्ध २.
राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री लक्षुमणपंत आण्णा स्वामीचे सेवेसी :-
पोष्य बाजी त्रिंबक कृतानेक साष्टांग नमस्कार विनंति येथील कुशल ताा मार्गसीर शुद्ध द्वितीयापर्यंत मुाा उ xxx येथें समस्त सुखरूप असो विशेष. तुह्मांकडून इतके दिवस वर्तमानकळत नव्हतें. त्यास, छ २० रमजानीचीं पत्रें आलीं त्याजवरून परम समाधान जाहलें. ऐसेंच निरंतर पत्र पाठवून साकलें वर्तमान लिहून पाठवीत जावें. विशेष, तेथचा मजकूर लिहिला. त्यास वोढ फार. मागें दोन तीन महिने हजारप्रमाणें देत होते. हालीं पांचप्रमाणें दरमाहा खर्चास देतात. त्यास, आपण लिहिलें कीं खर्चाचा अजमास पाठवून द्यावा. त्यास, खर्चास अजमासें साहा साडेसाहा हजार रुपये खर्च दरमाहा लागतात. तरी फार करून लोक दूर केले तरी इतका खर्च लागतो. आपणांस कळावें ह्मणोन लिहिलें असे. चिरंजीव यांस बरें वाटत नाहीं, ह्मणोन आपण लिहिलें. आतां बरें नाहीं. ज्वर निघाला ह्मणोन लिहिलें. त्यास सर्वश्व आपण तेथें आहेत. तरी समाचार त्याचा आपण घेत जावा. राजश्री विसाजीपंत आपणापासीं आहे तरी त्यांचा समाच्यार घेत जावा. खर्चाची हलाखी फार, ह्मणोन चिरंजीवांनीं लिहिलें आहे. तरी आपण श्रीमंतास विनंति करून चाळिस पन्नास रुपये द्यावे. यजमानानीं न दिल्हे तरी आपण द्यावे. आह्मीं ल्याहावें ऐसें नाहीं. परंतु सूचना मात्र लिहिली असे. आम्हीं येथें चाकरी केली ती रुबरु गांठ तुमची व श्रीमंत सौ॥ मातुश्री बाईसाहेबांची पडेल तेव्हां समक्ष सांगतील तेव्हां आपणांस कळेल. इतकें असोन चिरंजीव तेथें आहेत. उपरणें पांघरुणावांचून आबाळ. कारकुनाचा व त्यांचा वर्तमान आइकितों. तरी फार ल्याहावेंसें नाहीं. सर्व भरंवसा आपला आहे. बहुत काय लिहिणें ? लोभ असो दिजे. हे विनंति.