Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)

श्री.

लेखांक ११६.

१६९७ मार्गशीर्ष वद्य ३.

राजश्री लक्ष्मण आपाजी गो यांसि :-
सु॥ सीत सबैन मया व अलफ.

सुरतकर मोगल याजकडून सरकारची चौथायी येणें. त्यास, तो सुधामत देत नाहीं. येविशींचा मजकूर पेशजी लिहिला आहे. त्याप्रमाणें जनरालास समजावून जनरालाचें पत्र गंभीरास पाठऊन, मोगलास ताकीद होय तें करणें. हुजूरोनही गंभीरास सांगूं. परंतु जनरालाचें पत्र जरबेनें आल्यास गुंता पडणार नाहीं. जाणिजे. छ १६ सवाल. बहुत काय लिहिणें ? येथें ऐवजाची ओढ आहे ते पत्रीं किती लिहावी ? तुम्हास वाकीफच आहे व जनरालही अर्धे वाकीफ जाहाले असतील. सांप्रतच्या प्रसंगीं बारभाईंचे फितुरांतून सर्वांस ओढावयास फावलें. इलाज चालत नाहीं. बारभाईशीं विरोध करावा कीं, हे किरकोळ लबाड्या करितात. त्यांशीं विरोध करावा, तेव्हां येकही सेवटास जात नाहीं. सारें विलग पडलें आहे. येक जनराल मात्र आमचे पक्षावर प्रबळ. याजमुळें आमची स्थित आबरू आहे. वरकड सारे लबाड्या करावयास तयार. यास्तव जनरालाचीं पत्रें कारनेलीस क्षेप-निक्षेप यावीं. फत्तेसिंगाकडील वसूल पडला. ऐवज देणें. तेरा लक्ष वसूल फत्तेसिंगाकडीलच कारकून सांगतात. दहा वसूल, करनेल म्हणतात. साडेसहा अलीकडे सरकारांत तफावत किती ? यास्तव कारनेलीस पत्र जरूर जरूर पाठवावें. व गंभीरास व सुरतचे मोगलास अशीं ताकीदपत्रें पाठवणें. हुजूरही पाठवावीं. व निराल्याही ताकिदा जाव्या. जाणिजे. छ १६ सवाल.