Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)

श्री.

लेखांक १०९.

१६९७ कार्तिक शुद्ध १३.

पुरवणी राजश्री लक्ष्मण आपाजी गो यांसि :-
सु।। सीत सबैन मया व अलफ. कारनेल किटीण तुह्मावर बहुत श्रमी जाहाला व आह्मावर तसाच जाहाला. सारांश आपलें कामही नाहीं. व याचा दोष मात्र जाहाला. कित्तेक गोष्टी मेस्तर होमाचे रूबरू केल्या. तेव्हां त्यासारिखेंच बोलला. त्यांत कुचास मागत होते. तेव्हां कुच करीत होते हे तर गोष्ट त्याणीं केलीच नव्हती. मग आह्मीं कशी केली ह्मणावी? मजला निरोप देणार, दुसरा इंग्रेज कामावर आणणार, हेंही पुसिलें. तेंही नाकबूल गेलों. ऐसे किरकोळ मजकूर व काढावयाचा मजकूर कबूल जहालों. तेव्हा तुह्माकडे लटीक वाद येईल, हो त्यास स्पष्ट लिहील, तेव्हां तुमचें बोलणें तेथें प्रमाण पडणार नाहीं. हा मोठा दोष आला. परंतु गाइकवाडाचे कारभाराविसीं भीड धरली नाही. तेथे मात्र त्यास अर्धा ठास बसला. त्याविसीं त्यांणी बहुत पर्याय लाविले. जनरालाचा हुकूमच होता, ऐसेंहि सांगितलें. सारांश, जबरदस्तीमुळें आपलें वाजवीही बोलणे शेवटास जात नाहीं. डबईचे, उपद्रवाचे वगैरे किरकोळ मजकूर कांहीं नाकबूल गेलों; कांहीं कबूल गेलो. किरकोळ मजकुराचा वाद सांगितल्यास आपल्याकडेच लघुत्व येतें. त्याचे उपकार बहुत. तेव्हां किरकोळ बोलतांच येत नाहीं. सारांश, तुमचें बोलणें जनरालास केवळ प्रमाण पडणार नाहीं. होम खरें करावयास आले. त्याची माया त्याजकडेच दिसते. जातीत जात प्रमाण पडते. तथापि तुह्मी शाहाणे आहां व येथूनही गायकवाडाचे मजकुरांत काईल केलें, याजमुळें तिसरा हिस्सा प्रमाणिक- पण राहील. पुढें तुह्मी आलियास हे संतोषी, यास्तव यावें ह्मणोन अलाहिदा पत्रीं लिहिलें आहे परंतु जनरालाची मर्जी तुम्हांवर बहुत संतोषी असिल्यास तेथेंच रहावें. यांत गुण फार आहेत. यास भय मोठें आहे. रुष्ट तरी जाहालेच. परंतु भयही आहे. ज्यापक्षी राहणें त्यापक्षीं जनरालाचें पत्र आम्हांस यावें कीं, यास जाबसालाबद्दल आह्मीं ठेऊन घेतलें ह्मणजे तेंच पत्र कारनेलास दाखऊं. तेव्हां दोष पडणार नाहीं. जनरालाची मर्जी बहुंत तुह्मांवर प्रसन्न असलियास ऐसें घडेल. तुमचे विचारे जसें बरें दिसेल तसें करणें. तुमची नजरही बरीच चालते. येथील कच्चा मजकूर मात्र लिहिला असे. बडोद्याहून जलदीनें रणगडास रेवातीरीं आलों. तेथें इंग्रेज व चिरंजीव राजश्री बाळ वगैरे सारे आठा दिवशीं आले. पुढें दक्षणेस चलावें, हा मजकूर बोलण्यांत ठरला. त्यांत गावकवाडाचा कारभार ठीक न जाहला. दोघेही बराबर नाहींत व ऐवजही नाहीं. ऐसें जाहालें. यास्तव तो कारभार सुधरावयास आह्मी कारनेल यत्न करितों. होईल तें खरें. तपसील किती ल्याहावा ? कांहीं राजश्री रामचंद्र विठ्ठल चिटणीस लिहितील. अमीनखानाची नजर सुधी नाहीं. रा। सदाशिव महादेव पाठविलें, त्यासही उपद्रव जाहाला. प्रसंगावर नजर देऊन, आपाजी गणेशाची मामलत करार केली. च्यार रुपियांची नीशा ठरली. त्यांत अमीनखानानीं सिबंदीचें निमित्य ठेवून कारभार बिघडला. शेवटीं अमीनखानापासून च्यार रुपये घेऊन मामलत करार केली. सावकारी नीशा कांहीं दिल्हीं. तेही रुपये वसूल पडत नाहीं. सावकाराजवळ ऐवज थोडाबहुत मसलतींत पेंच पडेल. यास्तव खानदेशचे सरदेस भोडगांवपावेतों जावें, ऐसें ठहराविलें. कारनेल चलावें तर ह्मणतात हुकूम आणवितों ह्मणतात. क्षेपनिक्षेप तरी बोलत नाहीं. रेवातीरींही राहूं देत नाहींत. असें अर्धोदकीं आलों आहों. जनराल अंतस्त त्यास काय लिहितात, तेंही पूर्तें समजत नाहीं. परंतु जनराल वगैरे कोशलदार आमचे हितावर आहेत, हें जाणोन कुच करी करितों. आठा दाहा दिवशीं भोडगांवाजवळ जाणार, ऐसें योजिलें आहे. पुढें ईश्वरसत्ता प्रमाण. येकही निश्चय करवत नाहीं. तुह्मीं तेथील हरद्र मनास आणून लिहिणें. जसें ल्याहाल तसा डौल धरावा लागेल. येकही बोलणें इंग्रेजाचे शाश्वत दिसत नाहीं. काय करावें तें लिहिणें. जाणिजे. छ ११ रमजान.

(लेखनावधि:)