Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)

श्री.

लेखांक १०८.

१६९७ कार्तिक वद्य १२ वृद्धि:

राजश्री लक्ष्मण अपाजी गोसावी यांसि, मु॥ सीत सबैन मया व अलफ.
तुह्मीं विनंतिपत्र व हैदर अल्लीखान यांचा खलिता पाठविला तो पावला. लाख रु॥ चे होन पाठविले आहेत ह्मणून मारनिलेनी लिहिले आहे. जनरालांनी तुह्मास सांगितलेंच असेल. तरी ते वीस हजार पाचसे एकोणतीस दोन लाख रुपयाचे आले आहेत ते जनरालापासून घेऊन हुजूर पाठवून देणें. इकडील मजकूर कलमें :-

इंग्रेजी सामान स्वारी बरोबर होतें तें तुह्मांस दखलच आहे. त्याप्रों जखमी व आजारी होऊन गेलें व दारूगोळा भडोचेस राहिला. खानदेशांत जावयाचें योजिलें आहे. घाट चढोन गेलिया उपरी फितुरी मुकाबिलियास येतील. सामान पोख्त असलें पाहिजे, याजकरितां जनरालासी बोलोन आणखी सामान रवाना करीत ते करणें. सामान पोहोंचेतों परवानगीही येईलच.

येथील कुच मुकामचा प्रकार याचे चित्तास येईल तेव्हां करावा, हें उपयोगी नाहीं. येथील मर्जीनें व्हावें, हें उत्तम असें. कांही मर्जीनें चालतात, कांही ओढितात, केवळ ओढीत नाही. प्रसंग पाहून बोलणें नाही तरी चालतें हेंही तूर्त बरेंच आहे.

मेस्तर इष्टोर सरकारचे ममतेचा आहे. येथें असलियानें उपयोग. याजकरितां त्यांस व वालीस यास जनराल हुजूर पाठऊन देंत ते करणें. फार न ओढितां मर्जीने होईल ते करणें.

खासा स्वारी रणगडास रेवातीरी आली. रेवेचेठायीं भक्ती व कलकत्त्याची परवानगीही येणें याजकरितां तेथेंच च्यार दिवस रहावयाचे चित्तांत होतें. परंतु कारनेलीनें पुढें चालावयाविसी आग्रह केला. ते समयीच त्यांस सांगितले की, येथून कूच करणें, तेव्हा घाट चढून गेलियाखेरीज सोय नाहीं. फौजेस पोटास मिळाले पाहिजे, खानदेशचे सुमारे गेलियावरी च्यार रुपये पोटास मिळतील. याप्रों सांगितलें, तेव्हां मान्य केलें. हाली तापीपार जालियावरी पुढें जावयास आंदेशा करितात. सामान यावयाचें आहे, ह्मणतात. परंतु परवानगीची वाट पाहतातसें दिसतें. याचें बोलण्याचें प्रमाण नाहीं. पुढें तुची सलाह येईल तसें करूं. येथें पोटाचा मोठा पेच. शत्रू जवळ आहेत.

गाइकवाडाचा कारभार त्यांणी बिघडला. उभयतांचाही उपयोग चाकरीचा नाही व पैकाही नाहीं. ऐसें असोन याचीच रुष्टता हरएक विषयीं वाढून खटे व्हावें याप्रों याची रीत आहे. उपाय नाहीं !

ऐकूण कलमें पांच तुह्मांस कळावीं याजकरितां लिहिली असेत. समजोन, समय पाहून, बोलावयांचें तेंच बोलणें. सरकारचा उपयोग नाहीं, बोलून नाश, ऐसें असलियास न बोलणें. संमंध याप्तीच पडला आहे. जाणिजे. छ २६ रमजान. हैदर अल्लीखान याचे पत्राची नक्कल तुह्मांस पाहावयाकरिता पाठविली असे. छ मजकूर

लेखनावधि.