Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्री.
लेखांक ११४.
१६९७ मार्गशीर्ष शुद्ध १४.
पुरवणी. राजश्री लक्ष्मण अप्पाजी गोसावी यांसि :- सुाा सीत सबैन मया व अलफ. जनरालासी बोलोन जाबसाल उगऊन घ्यावयाचीं कलमें. ताा :- पाा.
अंकलेश्वर येथील दरसाल पाऊण लाख रुपये कोपिनीकडे द्यावे, याप्रमाणें करार असतां, तेथें मेस्तर शहानीं ठाणें बसविलें. दरोबस्त वसूल घेतात. त्यास पाा मारीं सरकारचे कादार असावे. पाऊण लाख रुपये मात्र कादाराकडून देवविले जातील. याचा जाबसाल करोन घेणें. या माहालचा रुपया सालमजकुरीं झाडून घेतला. हा याचे दरमहाचे खर्चात पडेल. मग रदबदली करितील. तेव्हां ऐकावयाचें नाहीं. कलम १ पाा.
हासोटचा मा तुह्मांस पेशजी लिाा होता. त्यास, विश्वनाथ नारायण व नारो गोपाळ साक्ष देत ऐसें पक्कें असावें, ह्मणोन लिहिलेंत. यास, हे दोघें मध्यस्थ. याणीं सरकारचे जाबसाल उगवून घेऊं, मग सनद देऊं, याप्रों करार करोन घेऊन गेले. आणि सनद अटकाविली आहे. हे साक्ष देतील. व मेस्तर हो यासहि सांगितलें आहे. जाबसालांत तफावत नाहीं. मेस्तर इटलीसही सांगावें, ह्मणोन लिहिलें. तरी ते दरबारास येत नाहीं याची गांठच पडत नाहीं तथापि बनलें तरी सांगोन पाठवूं. कलम १
गायकवाडाकडील ऐवज दहा लक्ष किंवा चवदा लक्ष कारनेलीकडे आहे ऐसें ऐकतों. साडेसाहा सरकारांत याणीं दिल्हे. वरकड याजकडे आहेत. तो ऐवज घ्यावयाविसीं जनरालानीं कारभाऱ्यांस लि॥ आहे, म्हणून तुम्हीं दर्शविलें. त्यास यास विचारिलें. हे नाहीर म्हणतात. याजकरितां जनरालाचें पत्र घेऊन हुजूर पाठवाल तरी ऐवज देतील.
पाा भुतसर व बोहारी हे दोन्ही माहाल नेहमीं अगर दरमाचे ऐवजीं सरकारांतून दिल्हे नसतां तेथें जबरदस्तीनें मेस्तर राबगंभीर याणीं ठाणीं घातलीं आहेत. उठवावीं तरी ठाणी घालणार येकीकडे राहातील. जनरालाचे चित्तांत विक्षेप येईल. याजकरितां उपेक्षा केली. त्यास, हें बोलोन दाहा महाल सोडून घ्यावयाविसीं यास ताकीद व्हावी. पैकी बोहारीचा अंमल चंदररायाकडे चालला आहे. भुतसर मात्र बोलणें. बोहारीचा शोध करून लिहून पाठवूं. चिखली, वांसदें, बलसाड येथील जकाती गंभीरानें उठविल्या.
भाटे पाा चौऱ्यासी हा गांव गायकवाडाकडील. तेथें तूर्त ठाणें घातलें व त्याचे जकातीसहि विक्षेप करितात. हे गोष्ट नसावी. सरकाराकडून उपेक्षा मुर्वतीनें होती. गायकवाड कलह करितील तेव्हां आह्मास शब्द जनराल ठेवितील. यास्तव हरयेक गोष्ट करारमदाराखेरीज होऊं नये. येविसीं बोलणें.
हैदरअल्लीखान याजकडील लाख रुाा होन आले ते तुह्मीं जनरालापासून घेतलेच असतील. त्यांत शिसें व बंदुकाचे खरेदीस दहा हजारांचे ठेवून वरकड हुजूर पाठवणें. पेशजी सनद पाठविलीच आहे.
फत्तेसिंगास जितके रुजू करूं तितके रुपये देणें म्हणोन ताकीद पाठवणें तरी महिना पंधरा दिवस चालेल. सदरहू कलमें समजोन, व खतसीर बोलोन, जाबसाल करोन घेणें. वाजवीचे रीतीस चिंता नाहीं. तुम्हीहि युक्तायुक्त पाहून करीत असतां. जाणिजे. छ १२ सवाल. बहुत काय लिहिणें ? नरम तरी बोलावें परंतु स्पष्ट बोलत जावें. परिणामीं गोड वाटेल. खोटें येकंदर करूं नये, बोलूं नये हेंच, आमची मर्जी समजणें. तुम्हीं तेथें प्रसंग पाहून बोलणें व सत्यच बोलणें. जाणिजे छ मजकूर.