Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)

येथें कोसलदार :- 
१ मेस्तर द्रेपर १ मेस्तर मास्टम १ मेस्तर फ्लेचर, १ आशबर्नर १ मेस्तर रामसी १ गारडीन बसऱ्याहून आला त्यासही कोसलांत घेतात.

यास पत्रें सरकारांतून बहुमानाचीं यावीं. पत्रें आल्यानें यांस संतोष होतो व जनरालास ही फार गोड ममता पुरस्कर वारंवार येत असावीं.

इष्टोल यांस हजार माणसाची सरदारी जनरालानीं सांगितलीं. तें माणूस तयार होत आहे. पुर्ते तयार करावयासाठीं त्यास येथें बलाऊन घेतलें. अद्यापि येऊन पोहचला नाहीं. पोहचेल. तेथें जनरालाचे ममतेचे आखणी दोघेजण आहेत. 

१ मेस्तर हो १ मेस्तर हाटली हे दोन आहेत. यांजपासीं अधिक उणें आज्ञा करणें असेल ते करीत जावी. उभयतां आपले प्रीतीचे ह्मणून जनराल सांगत होते. त्यांत मेस्तर हटली शाहाणा, खबरदार, मातबर आहे. हजार माणसाचा सरदार आहे.

गोवेंवाले फिरंगी याजवळ सरंजाम तयार आहे, ह्मणून ऐकिलें. त्यास, त्याजकडे युक्तीनें गुप्त पत्र पाठवून त्याचा शोध करितां त्यांजला सरकारचे एक पत्र पाठवावयाची आज्ञा कीं, कितेक आज्ञा लक्ष्मण आपाजी यांस केली आहे, हे तुह्मांस कळवितील, उत्तर लौकर पाठवून द्यावें. व याअन्वयें पत्र पाठवावयाची आज्ञा. पत्रांत स्नेहभाव बहुत असावे. १

राजश्री बापू व रामचंद्रजी आशिर्वाद उपरी. दर कुचास व दर लढाईस कारनेलींनीं अडवून मागावें तेव्हां कूच करावें. लढाईस कमी केली ऐसे, ऐसी नाना प्रकारे नालिश जनरालास कोणी समजाविले ह्मणोन मास्तर होमाचे गुजारतीनें किटणीने श्रीमंतास विनंती केली, ह्मणोन विस्तारपूर्वक लिहिलें त्यास, कारनेल किटीण यांणी बावापिराचें पुढें मात्र माईकवाडाचे कारभारसमंधें जातखत लेहून दिल्हें असतां, करारप्रों निकाल न केला हे गोष्ट लहान मोठ्यास ठाऊक. हें मात्र जनरालासी बोलिलों. वरकड दरकुचांत अडवून मागितलें अथवा लढाईत कमी केली, हें किमपी आपण जनरालापासी बोलिलों नाहीं. कारनेलीची नालिश मात्र तिळमात्र केली नाहीं. जनराल व कारनेल व मी तिघेजण स्वस्तिक्षेम आहों. जनरालास पुसावें. त्यांणी नालिशी केली असें ह्मटल्यास कारनेलीनीं नाहक आमचा संशय धरून वाईट मानोवें ऐसें नाहीं. 

सखाराम हरीकडील जासुदासमागमें पत्रें रवाना केली असत.