Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)

श्री.

लेखांक १०६.

१६९७ कार्तिक वद्य ३.

शेवेसी लक्ष्मण आपाजी कृतानेक साष्टांग नमस्कार विज्ञापना येथील वर्तमान ता। कार्तिक वा। २ शुक्रवारपर्यंत मु।। मुंबई स्वामीचें कृपेंकरून यथास्थित असे. विशेष बंगाल्याचा जाब अद्यापि आला नाहीं. जनराल कोसलदार रात्रंदिवस प्रतीक्षा करीत आहेत. मुदतीची अवधि तरी जाली. परंतु पत्र येऊन पोहोंचलें नाहीं. प्रस्तुतचे दिवस मुदतीपेक्षां अधिक जात आहेत. साऱ्यांचे लक्ष पत्राकडे लागलें आहे. आठ रोजांत पत्रही येईल. इकडील विशेष वर्तमान पूर्वी सेवेसी लिहिलें आहे. अधिकोत्तर ल्याहावेसें नाहीं.

महाराजांची स्वारी नर्मदा-दक्षणतीरास आली हें वर्तमान रा। बज्याबा, चिंतो विठ्ठल, व बाळाराव नि॥ सिंदे, यांसि सेवकानें व त्याकडील आपाजी साबाजी येथे आहेत. त्यांणी लेहून पाठविलें आह कीं, तुमचे संकेताप्रों श्रीमंत नर्मदातीरास आले, सोनगडास पोचल्या दाखलच. अत:पर तुह्मी विलंब न करतां सत्वर जाऊन सामील व्हावें. इंग्रजाचा पक्का भरंवसा आहे. ऐसीं दोन पत्रें पाठविलीं आहेत. महाराजानींही तिकडून याचअन्वयें पाठवावयाची आज्ञा करोन, ते लवकर येऊन सामील होत तें केलें पाहिजे. बाबूजी नाईक चौघेजन गावल्यानें दहा हजार फौज येईल. गुंता नाहीं. आपाजी साबाजीस शरिरीं समाधान नाहीं, याजमुळें राहिलें नाहीं तरीं, यांसच पाठविलें असतें. अद्यापिही दोन चार दिवसांत किंचितसा उतार पडला ह्मणजे पाठवितो. जनराल यांची खातरजमा उत्तम प्रकारें करितील.

मुंबई सफा बारभाईचे हाती लागेल, ह्मणोन बहुत दिवस वार्ता आहे. सत्य मिथ्या न कळे. माहाराजांजवळ बातमी, असेल ते खरी, श्रीं करोत कीं, हे गोष्ट खरी न होत.१

बंगाल्यांतून काम होऊन येतें हा मोठा भरवसा यांस. हे सेवकाची खातरजमाही करितात. व सेवकासही याचे ह्मटल्यावरून भरंवसा वाटतो. परंतु हुकूम बंगालेवाले याचे हाती आहे. यास महाराजांनी फौजेचा जम पडेल तितका पाडावा. राजकारणानें येतील ते लौकर येतले करावें.

गोविंदराव गायकवाड यांस कसेंही करून समजून आणावयाची आज्ञा व्हावी. सरकारचे सरदार व फौज आहे ते न फाटल्यानें आणखी राजकारणानें बहुत येतील. जुने रुसोन गेल्यानें येणार मागेंपुढें पाहातील. यास्तव गोविंदरावसुद्धां सारे फौजेची एकत्रता राहेसी आज्ञा व्हावी. १

बज्याबा सिंदे वगैरे यांची राजकारणें. १

मेस्तर मास्तिनानें वस्त्रें घेतली नाहीं, बहुत आग्रह केला, तथापि पादशाही व कंपनीची आज्ञा नाहीं, ह्मणोन घेऊन मग सेवकाचे बिराडास पाठविलीं. बारभाईकडे लक्ष यामुळें न घेतलीं, ऐसा अर्थ नाहीं. सरकारचेंही ममतेत आहेत. १