Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

सन ११८२ मधे श्रीमंत माधवरावसाहेब यांस शरीरास रोग होऊन कार्तिक व ।।८ अष्टमी दरजागा थेऊर तेथे गणपतीचे देवळांत काळ जाहला. त्यांची स्त्री रमाबाई सहगमन गेली. धाकटे बंधू नारायणराव यांस राज्याचे अधिकारी वस्त्रे होऊन राज्य इ।। सन म।। त।। सन ११८३ भाद्रपद शु।। १४. स्वारी बाहेर निघाली होती. स्वारी होऊन घरास आले, तो गर्दी होऊन जिवानिसी प्राणधात जाहाला. ते समयी त्यांची बायको गंगाबाई गरोदर होती. ते पुढे वैशाखमासी प्रसूत जाहाली. पुत्ररत्न जाहाले. त्याचे नांव सवाईमाधवराव ठेविले. त्याचे नांवे सिके होऊन राज्य चालू लागले. नाना फडणीस यांनी धुरंधर कारभार करून राज्य चालविले. इ।। सनमा ता सन १२०५ अवल अश्र्वीन शु १२ द्वादशीस एकाकी भ्रम पडून मयत जाहाले. सवाईमाधवराव यांचा मृत्यू जाहला. सन ११८३ मधे नारायणरावसो यांचा काळ जाहाला. नंतर दादासो यांनी तमाम सरदार बोलावून जमाव करून निजामअल्लीवर बेदरावर जाऊन निजामअल्लीस जेर केले, शिकस्त जाहला. शरण येऊन उभयपक्षी भेटी जाहल्या. सलुख होऊन कर्नाटकाकडे फौजबंदी दादासाहेबांनी करून स्वामीकार्तिकापर्यंत गेले. फौजेस जागाजागा मुलुकाच्या कामगिरा सांगितल्या. उत्तरेकडे त्रिंबकरावमामा यांनी तमाम सरदारांस बोध करून, गंगाबाईच्या नांवे सिके कटारी करून तमाम सरदार एकवट केले, हे वर्तमान दादासाहेबास कळले. नंतर त्यांची स्वारी माघारी फिरून कूच दरकूच क्षेत्र पंढरपूर येथे चेत्र शु।।१२ द्वादशीस येऊन मोकाम जाहला. त्यास्थली त्रिंबकरावमामा तमाम सरदार एकवट करून निजामअल्लीसुध्दा आले. त्यास्थळी युध्द जाहले. दादासोस यश आले. त्रिंबकरावमामा युध्दप्रसंगी सापडले. तमाम फौजा एकवट जाहाल्या. त्रिंबकरावमामा यास दादासो स्वारी समागमे चालविले. त्यांस जखमा लागून जेर जाहले. खडकतचे मो त्यांचा मृत्य जाहला. दादासोचे पाठीलाग हरिपंत फडके वगैरे सरदार यांनी करून, समग्र सन ११८४ ता सन ११८५ मुदत साले २ छावणी करून, दादासो यांचे धारेचे पोवार यांचे वि करारमदार होऊन समजूत करून हरिपंत फडके वगैरे सरदार फौजसुध्दा माघारे देशास आले. आपलाले ठिकाणास दाखल जाहाले. ते साल सन ११८६ अवल साल ठिकाणास आले