Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

पुढे आठा चोहो रोजांनी आम्हांस समजले, चार सोदे मिळोन दौलत लुटली. पुढे मुलाची आई गंगाबाई इचा बुध्दिभ्रंश केला. तिची आई, भाऊ, मामा वगैरे लुच्चे मिळोन गैरवर्तणूक मनस्वी करू लागली. ती मुलास सोसेना. त्याच्याने पहावेना. सबब जवळ होते त्यास बोलो लागला. म्हणोन चवथे मिळोन गंगाबाईस मसलत दिल्ही जे, मूल धूर्त बहुत कठिण दिसतो, वरीष दोन वर्षे दौलतीत भर घेतल्यास तुझी दशा बरी नाही, तुला सैर पीठ लावील, याकर्ता आजपासून याला कैदेत ठेवावा, नांवास अधिकारी आहेच, पूर्वी निळकंठराव यांस रखमाबाईने कैदेत ठेवून स्वामीपणा केला तसाच त्याप्रमाणे आपण करावे, मूल जेऊन पडला राहील. अशी मसलत देऊन, मुलाचा अवमान आरंभिला. चाकरानफरी मनस्वी व्यंगोक्तिशब्द बोलावे, भटांनी तोंडावर मारावी, मुलाने डोके फोडावे, रक्तस्त्राव व्हावे, दुःखे आपल्याच्याने पाहवेना; सबब त्याचे आमचे कजिये नित्य होऊ लागले, म्हणोन निघोन पुणियास आलो. मागे मूल कैदेत ठेविला. पाहरा बसविला. एक महिन्यापर्यंत प्रातःकालापासून दोन प्रहरपर्यंत यजमान जाग्यावर बसवावे, लघुशंका लागलियास धोत्रांत करावी, बाईची परवानगी उठण्यास नाही. दोन प्रहरां उठोन, स्नान घालून, भोजन करवून, फिरोन पाह-यांत बसवावे. प्रहर रात्रपर्यंत याप्रे || येक महिना दुःख सोशिले. आम्ही पुणियांत. आमचे कुटुंब तेथेच. तेथील बातमी आम्हांस कळवावी, तर वाटेस चवकी पहारे बसविले. उपाय नाही. त्याजवर सहजी आम्ही निघोन आळंदीस गेलो. मुलाने पाहतांच रडू लागला. जाऊन मांडीवर घेतला. मजकूर विचारिला. त्याणे जे कारण कैद करण्यास जहाले ते सांगितले. तो मजकूर ऐकून मुलास कडेवर घेऊन पाह-यांतून उठून आपल्या बि-हाडास नेऊन ठेविला. नंतर कारभारी याचा व गंगाबाईचा आमचा अनर्थापात होऊन श्रीमंताकडेस जातो, म्हणोन पुणियास आलो. विसाजीपंत वाडदेकर यांस मजकूर समजाविला. कारभार त्याकडेसच होता. त्यांनी आम्हांस श्रीमंतांकडे जाऊ दिले नाही. विसाजीपंती ढालाईत पाठवून गंगाबाईचे भाऊबंद धरून आणले आणि पारपत्ये केली, पहा-यांत बसविले वगैरे खिसमतगार ज्यांनी ज्यांनी मुलाची अमर्यादा केली होती त्यांस आणून पारपत्ये केली होती त्यांस आणून पारपत्ये केली.