Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

यासी सुभेदक्षणचे पादशाहातीची वाटणी करून, आपले स्वदस्तुर जाबिता करून, पादशाहा याने देहावसनाचे अगोदर करून ठेविले. विज्यापूरचा सुभा कांबक्षाचे नांवे कायम केला होता. पादशहा याचा काळ होतांच तिघा भावांनी फौजबादी करून, आपले आपल्यांत लढाई करून, आजमशा व कांबक्ष उभयता मयत जाहले. वडील बहादुरशहा राहिला. त्यांनी ता सन ११२२ परयंत पादशाही केली. त्याच्या पोटी संतान जाहले नाही, नकल जाहली. त्याचे गोत्रज भाऊबंद पैकी पादशाइचे तख्ती बसवीत आले. सन १११७ मधे लढाई जाहली. त्या गर्दीमधे राजा शाहू कैदमधे होता. पादशाचे जिम्हेत होता. तो गर्दीमधे सुटोन निघोन आला. त्यांनी गनीमाईचे राज्य उभे केले. प्रतिनिधी श्रीनिवास परमराम, पंतप्रधान बाळाजी विश्र्वनाथ, आनंदराव रघुनाथ सुमंत, नारबा सेणवी मंत्री येणेप्रमाणे अष्टप्रधान सिध्य करून राज्यपत्रे होत आली. सन १११८ ता सन ११५९ मार्गेश्र्वर शुध्द सप्तमी परियंत राजा शाहू याने राज्य केले. मार्गेश्र्वर शुध्द अष्टमीस त्यांचा अंतःकाळ सातारागडावर जाहला. त्याचे गोत्रज भोसले यांचे कुळांतील राजाराम भोसला आणोन सिंव्हासनी बैसविला. राजा शाहू यांनी अंतःकाळचे वेळेस तमाम सरदार सातारा गडानजीक जमाव केला होता. फौजबंद कोणापाशी किती आहे, या गोष्टीची चौकसी करितां, तमाम सरदार फक्त फौजबंदी न करितां राहिले होते. बाळाजी बाजीराव पंतप्रधान उपनांव नानासाहेब यांजपासी फौजबंदी वीस हजारपरयंत तयार होती. त्यास आणोन विचारणा केली. तेव्हां राजा याजपासी नानासाहेबी विनंती केली जे, सांप्रत वीस हजार फौज तयार आहे, आणखी आज्ञा जाल्यास फौज आणवितो. ऐसे उत्तर ऐकोन, राजा बहुत संतोष होऊन, नानासाहेब याचे मस्तकी हात ठेऊन बोलले. एथून राज्याचा बंदोबस्त करणे, गड किल्ले याचे तमाम स्वाधीन केले. शिके कटारी नानासाहेब याचे हवाला करून स्वमुखे करून बोलले जे, आमच्या बैका आमचे समागमे लाऊन देणे, ताराबाई चुलती आहे तिजला कैद करून ठेवणे. ह्म-