Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

एणेप्रमाणे सादनूक करून सनद करून घेतली, सन १०९८ सन जुलूसवाला ३२० या सनामध्ये काजीपणाचे मोहरेस सरकारांतून परवानगी घेऊन मोहर केली. त्या दिवसापासून मोहरेचा भोगवटा चालत असे. दक्षणीचे पादशाहीमध्ये काजीची मोहर नव्हती. अवरंगजेब याचे कारकीर्दीपासून चालत आहे. सन ११०५ ता ११०७ परीयंत तीन साला विज्यापूर कारकीर्दीचा रकमाळा बांधिला होता त्याअन्वये पामारची बेरीज कसबेसुधा गांवगना मिळोन सायेर जकायत बा मिळोन एकूण बेरीज ७५००० पावणा लक्ष रुपये जमाबंदी करून वसूल घेतला. पुढे सन ११०८ साली कसबेमार व पोमार हा प्रगणा पादशाहांनी सरकारांत खालसा केला. मीरकासम करोडी यास चौकशीस किले मंगळवेढा येथे पाठऊन रबीचा माहसूल यावर पीक पाहून लष्कर ब्रह्मपुरीवर येऊन राहिले. सबब निरखगिरींनी जाहालियमुळे आकार सन ११०८ साली जमाबंदी कसबा व प्रगणा मिळोन आकार रु ।।२००००० दोन लक्ष जमाबंदी मोकरर करून जमेदार यांचे नावे कबूलकतबे सरकारांत घेतले. त्याप्रमाणे वसूल घेतला. पुढे सन ११०९ साली पेशजी अंमलदार आह्याखान होता. त्याने आपणाकडे नोकरपण आले ऐसे जाणून कबुलात रु ४०००० जाजती करून दोन लक्ष च्याळीस हजार जमाबंदी करून वसूल घेतला. तिसर साली सन १११० (सन अकरासे दाहा) त्या साली एकुणीस हजार रुपये जाजती जमा चढऊन दोन लक्ष एकुणसाठ हजार साइरसुधा मोवाजना जमेदाराचे दसकतनिसी सरकारांत करून घेतला. त्या त्या बेरजेमुळे कसबा व पो दरोबस्त पडजंगल होऊन वैराण जाहला. रयत देशांतरास उठोन गेली. त्याता गांव वैराण जाहला. पादशाहाची स्वारी सन १११० मधे लष्कर कूच होऊन रखावस पुरावर मजल दरमजल मीरज इलाइतीवर मो करून राहिले. तेथोन कूच करून आमदनगरानजीक लष्कराचा मोकाम जाहला. सन १११६ माघ वा १४ छ २७ जिलकादी पादशाची वाका फौत जाहली. त्यास पुत्र तिघे तपसील- १ वडील बादरशाहा १ दुसरा आजमशाहा १ तिसरा कांबक्ष पादशाहा.