Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

श्री.
१।८ रास.
प्रकरण पांचवे

हकीकत कसबे मंगळवेढा पो मजकूर अमलदारांनी अमल पंत प्रधान पेशवे, इस्तक बिल सन ११६० इहिदे खमसैन मया व अलफ. गड सातारा एथून फौजसुध्दा तयारी करून मोहीम या प्रांतास श्रीमंत नानासाहेब उपनाम बाळाजी बाजीराव पंतप्रधान व भाऊसाहेब उपनाम सदाशिव चिमणाजी चुलतबंधू उभयतांस राजांनी अंतःकाळी मस्तकी हस्त ठेवून देवलोकाप्रती गेले. राजयाची कृपा होऊन तमाम देशाचा बंदोबस्त करावया उद्देशे स्वारी तयारी करून, समागमे सरदार नामे घेऊन मजल दरमजल कसबे सांगोलेनजीक लष्कराचा मुकाम करून, किले सांगोले येथे यमाजी सिवदेव नि श्रीनिवास परशराम प्रतिनिधी याचे ठाणे त्या स्थळी होते, यमाजी सिवदेव किलेमजकुरी होते, त्यास शाहा देऊन जेर केले. भाद्रपद वा ८ अष्टमीस येऊन फौज मुक्काम जाहला. अश्र्विन वा ८ परयंत ठराव होऊन सिवद्याकडील जे ठाणी होती ते मशारनिलेनी घेतली. सांगोलेचे ठाणे राजयाच्या स्वाधीन केले. तेथून सनदापत्री सिवद्यापासून ठाणेयाची सोडपत्रे लिहून घेतली मंगळवेढे व ब्रह्मपुरी दोन्ही परगणेयांची पत्रे घेऊन किले मंगळवेढा प्रगणासुध्दां माहाल राजश्री गोपाळराव गोविंद पटवर्धन याचे स्वाधीन केला. त्याची फौज खासासुध्दां तयार होऊन अश्र्विन व ।।११ दोनप्रहरी गावाकुसानजीक पूर्वभागी हणमंताचे देवळाचे पूर्वेस महदानी डेरे देऊन मुकाम केला. नंतर सुमूहूर्त कार्तिक शु।।१ प्रतिपदा बळी ते दिवसी गोपाळराव गोविंद याचे ठाणे किलेमजकुरी बैसले. सिवद्याचे ठाणे निघोन गेले. कसबे ब्रह्मपुरी येथील ठाणे माचनूरचे भीमातटाकी हुजूरपागेकडे चिमणाजी बापूजी राघो बापूजी यांच्या स्वाधीन केले. कासेगांवचे ठाणे यमाजी सिवदे यास रहावास दरोबस्त स्वाधीन केले. मंगळवेढा प्रगणा पादशहाचे कारकीर्दीपासून इस्तकबिल सन १११० ता ।।सन ११६० परयंत पन्नास वर्षे वैराण होऊन जमीन पडजंगल, झाडी वाहडली होती. त्याची उस्तवारी जमेदारास भंडारकवठेच्या मोकामी लष्कराचा मोकाम जाहला होता त्या स्थली जमेदारास कौल करार करून रु।। १४०००० एक लक्ष चाळीस हजार रु।। देऊन गोपाळराव गोविंद याचे आज्ञेत राहून नांदणूक करावी, ऐसा हुकूम जाहला. तो शिरी वंदून, ठाणेदार गोपाळराव गोविंद याचे चुलतबंधू मेघःशामराव कृष्ण यास कमाविसी नेमून समागमे जमेदार देऊन, किल्लेमजकुरास पाठविले. लष्कर कूच होऊन मुलुखगिरीस रवाना जाहले. जागाजागा तुफर होते त्यांचे पारपत्य करावे या उद्देशे मोहीम. खास स्वारीसुध्दा राजश्री दमाजी गाईकवाड याजवर चढाई करून, त्यासी वेढा घालून, त्याची फौज समग्र लुटून, गाईकवाडमजकुरास कैद केले. त्याचा पुत्र सयाजी गाईकवाड किल्लेस आणून कैदेत ठेविला. वैशाखमासी गाईकवाड याची फौज लुटली. श्रीमंतांची स्वारी क्षेत्र पंढरपुरी येथे येऊन, देवदर्शन घेऊन, पुण्याचे मुकामास जाऊन राहिले. त सन साल गुदरले. नंतर सन ११६१ इसन्ने खमसैन मया व अलफ त्या साली श्रीमंतांची व निजामअल्लीची लढाई जाहाली. पेडगावच्या आसपास उभयतांची लढाई मातबर जाहाली. निजामअल्लीची खराबी बहुत जाहाली. फौज बुडविली. श्री नानासाहेब व भाऊसाहेब यांस यश आले. ते साल गुदरले. इ।। सन ११६२ सलास खमसैन मया व अलफ त्या साली निजामअल्लीने फौजबंदी करून आणखी लढाईस सिध्द जाहाले. श्रीमंतही फौजबंदी करून मबजूद उभे राहिले. उभयपक्षी परस्पर लोक जखमी जाहाले. लढाई मातबर जाहाली. त्याप्रमाणे सन ११६३ अर्बा खमसैन मया व अलफ त्या साली उभयतांचीही लढाई जाहाली. सन ११६४ खमस खमसैन मया व अलफ त्या साली अमदाबाज किल्ला येथे श्रीमंतांच्या फौजांचा शाहा बैसोन लढाई मातबर जाहाली. हाला करून अमदाबाजचा किला सर केला. ठाणे श्रीमंताचे बैसले.