Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड अकरावा ( १६९१-१७६०)
भागानगराचा तानाशा पादशहा यास जेर करोन, जिवे मारोन, आपले ठाणे त्या स्थळी बैसोन, लष्कर कूच करून, पेडगावावरून स्वारी येऊन जागाजागा ठाणी बसवीत आले. सन ११०५ सन अकरासे पांच. किल्ले मंगळवेढे नजीक च्यार कोसावर भीमातटाकी मौजे माचनूर पो ब्रह्मपुरी येथे येऊन लष्कराचा मुक्काम करून, छावणी करून राहिले. इ।। सन ११०५ ता सन १११२ मुदत साले सात परयंत त्या जागियावर बुनग्याचा मोकाम केला. माचमूरनजीक नदीतीरी गडी बांधोन, त्या गडीचे नांव इस्लामपुरी ठेऊन, पादशहा त्या स्थळी राहून, किले मंगळवेढा येथे आठा दिवसांनी गुरुवारी निजामास येऊन, किल्मजकुरी मस्वीद आहे त्याठिकाणी निजाम काही दिवस केला. नंतर कसबेमजकुरी हजरत याच्या दरगाहमध्ये जाऊन, देवताशी भाषण समक्ष होऊन चार घटका दरवाजा बंद होऊन पादशाहासी भाषणे जाहाली. हा चमत्कार पाहून अवरंगजेब पादशाहा याची भक्त त्या स्थळी बसली, त्याजमुळे दरगाहनजीक महजीद होती. त्या स्थळी निजाम करावयाचा सिध्दांत केला. दर आठवडेस गुरुवारी दरगाहमध्ये स्वारी येऊन त्या स्थळी निजाम होऊ लागले. लष्कराचा काजी बुराण होता तो बहुत पेश लष्करामध्ये जाहला होता. त्यासीही पादशहा यांनी विचारणा केली जे तमाम लष्कराचे मनुषे बहुत जमाव होऊन निजामास उभे राहिले आहेत, जागा थोडी, निजामास सर्वत्र मनुष्य उभे राहिले, त्यांचे श्रवणी शब्द पडत नाही, तेव्हा निजामास रुजू आहे किंवा नाही, त्याचा शास्त्रार्थ कैसा आहे तो सांगणे. ऐसे बोलता, काजी बुराण याने शास्त्राचा शोध न पहता आंगचे बुध्दीने भाषण केले जे, महजीद नजीक उभे राहिले त्यांचे श्रवणी निजामाचे रुजू होऊन दुरुस्त आहे, वरकड लोक लांब उभे राहिले त्यांचे श्रवणी निजामाचे शब्द अजिबात पडत नाहीत तेव्हा ते लोक निजाम रुजू नाहीत ऐसे काजीने उत्तर केले. नंतर पादशाहास त्या गोष्टीचा संवशय पडला. या गोष्टीचा संवशय निवारण व्हावया उद्देशे चौकशी करणे सबब कसबेमजकुरी काजीस बोलाऊन पाठविले. त्यास कसबेमजकुरीचे काजी मुला मुतोजी हा होता. तो मैत जाहला. त्याचा पुत्र आबाखान जाकरा बहिरा होता.