Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

काजीपणा करावयास कोणी अवलदीत नाही, सबब त्याचा जावई महमद अयुब हाबले, भाई मुलाणा महजीद नागरबावी याचा फर्जद होता. तो बोराळकर अबदुल नदीब मुलाणा याजपाशी विद्याअभ्यास करून आपले महजबमध्ये दुरुस्त जाइला होता. त्यास पादशाहापाशी पाठविले. नंतर पादशहा यानी निजामाची प्रछया करून विचारणा केली. तेव्हा महमद अयुब याने उत्तर केले की, या गोष्टीस फुरसत द्यावी, शास्त्राचा शोध पाहून येतो. तेव्हा पादशाहा यांनी उत्तर केले की, आपण कूच करून मुकामास जातो, तुम्ही शास्त्राचा शोध पाहून लखोटा करून मोकामास पाठऊन देणे. ऐसे बोलोन स्वारी तयारी करोन गेले. नंतर महमद अयुब यानी शास्त्र पाहून लखोटा करून लष्करास पाठविला. तो पादशहा यांनी फोडोन वाचोन पाहिला. त्याजमध्ये शास्त्राचा अर्थ होता तो पाहून पादशहा यासी स्मरण धाकुटेपणाचे वयेत अभ्यास केला होता त्याचे स्मरण जाहले. लखोटेयातील अर्थ व पादशाहास वयेत येत होती दोहोंचा अर्थ एकच जाहला; सर्वत्र जवळ व लांब उभे राहिले ते एकरूप निजामास रुजू आहेत, त्यांमध्ये भेद कांही नाही. कसबे मंगळवेढा येथील काजी याचा लाखोटा आणविला हे वर्तमान ऐकोन, काजी बुराण लष्करवाला याने झहर घेऊन प्राण दिल्हा. आपणाकडे दूषण आले याजमुळे प्राणघात करून घेतला. कसबे मजकुराच्या काजीचा जावाई महमद अयुब याजवर मेहेरबानगी जाहाली. ते समयी महमद अयुब याने दरबारकचेरीस पेश पडोन सरकारां अर्जी लिहून दिल्ही की, आपली काजीपणाची जमीन इनाम चावर १४ चवदा सुलतान महमदशाहाच्या वेळेस कारकीर्दीस चालत होती ती सनद गुमसूद जाहली. ऐसा मतलब गैरवाका समजाविला. याचे शहाणपणावर मुछदी यांनी चौकसी न करिता पादशाहा यासी समजाऊन त्याचा हुकूम जाहाला जे, च्यार चावर जमिनीची काजीपणाची इनामाची सनद तयार करून देणे. ऐसा हुकूम जाहाला. त्यावरून च्यार चावर जमिनीचा फर्मान महमद अयुब बिन मुला मुतोजीब काजी याचे नावचा करून च्यार तक्षिमा मोकरर केल्या ता
महमद अयुब बिन मुला मुतोजीब काजी लाने बा तक्षीम चावर एक १८
आबाखान खावंद कदीम चावर एक १८ अली अकबर हिंदुस्थानी जावाई १ बद्दल दरबार रखवाली करणे.
अलमखान समदी जावाई जमीन चावर १