Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड अकरावा ( १६९१-१७६०)
श्री.
प्रकरण चवथे
इ।। अमल बहिरजी राजे पांढरे सन १११८ माघ मास ता सन ११५३ श्रावण श्रु।। १५ पौर्णिमा परियंत-किले मंगळवेढा येथे ठाणे त्या जागी होते. त्याजपासून श्रिनिवास परशराम प्रतिनिधी त्यांचे मुतालिक यमाजी व अंताजी सिवदेव यांजपासून ठाणी तमाम घेतली. त्याप्रो मंगळवेढे येथे आपले तर्फेने आनंदराव गंगाधर सुभेदार सन ११५३ ता सन ११५६ माघ शु।। सप्तमी परियंत होते. पांढरे यांनी जमाव करून किले माचनूर नजीक नदीपलीकडे बेगमपुरावर आले. किलेमजकुरावर आनंदराव गंगाधर फौजबंदी करून पांढरे याजवर तमाम स्वारानिसी लढाई जाहाली. ते समई .... गोळी लागून ठार जाहाले. पांढरे आपले ठिकाणास निघोन गेले. आनंदराव याचा धाकटा बंधू सखो गंगाधर किलेमारी ठाणेमधे होते ते सन ११६६ अश्र्विन वद्य १४ परयंत राहून श्रीमंत पंत प्रधान पेशवे यांचे तर्फेचे गोपाळराव गोविंद (यांचे ठाणे बैसले.)