Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

श्री.
प्रकरण २ रे .

हकीकत कसबे मंगळवेढे पैकी मजकूर सरकार सुभे दारुलजफऱ बिजापूर सुभा.
हिंदुस्थानातून राजा जैसिंग, रजपूत या देशास स्वारीसुध्दा आले, त्या भये तमाम मुलूक वोस होऊन गेला. ते साल सन १०७५ सीत सितैन अलफ. अबरंगजेब महाबळी पादशहा याची मोहीम दक्षण देशास स्वारी तयारी करून कूच करून मजलदरमजल दौलताबाद सुभा तेथील पादशा त्या स्थळी मोकरर असता त्यासी त्या जाग्यावरोन काहढावे, तो दौलताबादचा गड आपण सर करावा, या उद्देशे फौजसुध्दा येऊन छावणी गडानजीक च्यार कोस मौजे खडकीवर मुकाम केला. सन १०८२ सलास सबैन अलफ ता सन १०९४ परयंत मुदत साले बारा अवल साल परयंत त्या जागीयावर मुक्काम केला. आंबराई लावून आंबे त्या जागीवर खाल्ले. शाहार अवरंगाबाद वसऊन बावनपुरेची वसाहत केली. च्यार कोस परयंत एकसारखी वसाहत जाहली. सुभा दौलताबाद हा कदीम होता तो मोडून, ते जागा आपले ठाणे वसऊन, तेथील पादशा जिवे मारून, आपण नवा सुभा बसविला. त्याचे नांव खुजस्ते बुनियाद ठेऊन, जरब एकसाली बसविली. त्या दिवसापासून अवरंगाबादचा सुभा प्रसिध्द जाहला. तो चालत असे. मिति शके १७२० कालयुक्त नाम संवत्सरे ऊर्फ सन १०२८ भाद्रपद वा ६ शेस्टी.