Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

रास
प्रकरण ३ रे.
(ह्या भागाची पहिली व शेवटली कांही पाने गहाळ झाली आहेत.)
दलशा थोरला दलखान धाकटा
१ सातवा सुलतान
शिकंदर
----------


एकूण सात पादशहा विज्यापुरी गुदरले. त्याचे गुमट प्रते नावाचे आहेत. सातवा सुलतान सिकंदर याचे वेळेस हिंदुस्थानांतून अवरंगजेब महाबळी पादशहा याची स्वारी फौजसुध्दा दक्षण देशास येऊन दौलताबादनजीक मुकाम करून छावणी केली. दौलताबादचा पादशहा यास जिवे मारून दौलताबाद सर करून आपले ठाणे कायम केले. दौलताबादनजीक मौजे खडकी चौ कोसावर होती त्या ठिकाणी मोकाम केला. मुदत साले बारा इस्तकबिल सन १०८२ सल्लास सबैन अलफ ता सन १०९४ अवल साल खमस समानीन अलफ, रक्ताक्षी नाम संवत्सरे शके १६०६ परयंत लष्कर त्या ठिकाणी राहिले. नव शाहाराची वसाहाती करून पुरे बसविले. दौलताबादचा सुभा कदीम होता तो माजी करून, अवरंगाबादचा सुभा जदीद वसऊन, खुजस्तेबुन्यादी नाव ठेऊन, एकसाल त्या स्थळी घालोन, दक्षण देशास फौजसुध्दा येऊन, विज्यापूर नजीक मुकाम केला; सन १०९४ जेष्ट मास अवल साल तागाईत सन १०९६ क्षयनाम संवत्सरे सन सबा समानीन अलफ. त्या जागी छावणी करून, विज्यापूरचा पादशहा सुलतान शिकंदर यास जिवे मारून, विज्यापूर तक्त घेऊन, आपली ठाणी अवरंगजेब यांनी घातली. दक्षणचे पादशहा बुडवून, लष्कर कूच करून गलगल्यावर येऊन मुक्काम केला. तेथून कूच करून सातारागडानजीक मोकाम करून राहिले. शिवाजी राजा भोसला याचा पुत्र संभाजी राजा भोसला सातारा गडावर होता, त्यास जेर करून शिकस्त केले. त्याचे डोळे काहढून, त्यास जिवे मारून, त्याचा पुत्र राजा शाहू मूल होता, त्यास कैद करून स्वारी समागमे आणला.