Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

लेखांक ९२.
श्री.
१६७७ वैशाख शु ।। ५.
तीर्थस्वरूप राजश्री वासुदेव दीक्षित दादा वडिलांचे सेवेसी-

अपत्ये बालकृष्ण दीक्षित पाटणकर मु श्रीवाराणसी सां । नमस्कार विनंति उपरी. तुम्हांवर चिठ्ठी केली १ येथे मार्फत यादव प्रल्हाद राजश्री गंगाधरभट मल्हारभट यापासून घेतले असे. ३९२ तीनशे ब्याण्णव रोकडे. तेथे गंगाधरभट मल्हारभट यांसी माघ शु ।। १० पासून मुदती दिवस ७१ येकात्तरी ठावठिकाणा चौकस करून रोकडे रु ।। द्यावे. पावलियाचे कबज घेणे. बहुत काय लिहिणेॽ हे नमस्कार. दस्तुर बापुजी महादेवभट पै. वैशाख शुध्द ५ दुपार, शके १६७७ युवानाम संवत्सरे.
लिखित गंगाधरभट व मल्हारभट कडेकर. पत्राप्रमाणे रुपये भरून पावलो. मित्ती वैशाख शुध्द ५.

लेखांक ९३.
श्री.
१६७७ वैशाख वद्य ९. तीर्थस्वरूप राजश्री दादा यांप्रति-

श्रीवाराणशीहून बाळकृष्ण दीक्षित पाटणकर कृतानेक साष्टांग नमस्कार विनंति येथील क्षेम ता जेष्ट व ।।९ रविवार जाणून स्वकीय लेखन करावयासी आज्ञा केली पाहिजे. यानंतर हरिदास कृपाराम याचे दुकानींची ल्हणी हुंडी रु ।। १०००० दहा हजार रु ।। ची पाठविली ती काली शुक्रवारी पावली. मुदती जाहाली म्हणजे रु।। घेऊन जाब पाठऊन देऊं. कळले पाहिजे. सदरहू दहा हजार रु.।। पावले असेत. वर्षासनाचा हिशेब व कागद ऐसे हरभट मोडक यांजबरोबर आजीच रवाना केले आहेत. पावलियाचे उत्तर पाठविले पाहिजे. बहुत काय लिहिणेॽ हे नमस्कार.
चिरंजीव गोविंद दीक्षित व रामचंद्र दीक्षित यांस आशीर्वाद. लोभ असो दीजे, हे आशीर्वाद.
पौ अधिक वा. ७ रविवार, शके १६७७, युवानाम संवत्सरे.