Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ६४५
१७२५ आश्विन शुद्ध १०
रघोजी भोंसले सेनासाहेबसुभा यांस ( पत्र ) कीं: बहुत दिवस जाले. दर्शनाभाव म्हणून चातकन्यायें मार्गप्रतीक्षा करीत असतां, पूर्वेकडून हस्तनक्षत्रास वायु घेऊन अमृतवृष्टी करीत असतो. हा स्वभाव. तसेंच श्रवणांत आले. तेणेंकरून परम संतोष जाहला. त्यांत अठराभार वनस्पतीसह जलचरस्थळचरखेचरांसह आनंद जाला. त्यांत मी एक चातक बहुत दिवसांचा तृषार्त. तो तृप्त कसा न होय ? यानंतर उभयपक्षीं हितकारक विजयादशमीचे मुहूर्ते कागद सैन्यांत रवाना केले. त्यांत पांच कलमांची पुा सेनासाहेब सुभा यांस कार्याचा अवसार जाणून अलाहिदा पुरवणी लिहिलीच आहे. त्यांत सामान्यांचा स्वभाव, आपलें कार्याचें स्मरण असावें, दुसरेयाचें विसरावें. तसें आपण न व्हां. उदार चित्तानां तु वसुधैव कुटुंबकं, असें जाणून विस्तारें लिहिलें आहे. श्रवण करून, मागील श्रवणाचें मनन करून, श्री महायात्रेंत जावयाचे साहित्यांत तृते दस्तक व पत्राचें उत्तरे पाठवावयासी आज्ञा होऊन पत्रदर्शन मजला होईल तोच चंद्रचकोरासम आनंद होयसें केलें पाहिजे. बहुत काय लिहिणें ? लोभाची वृद्धी करीत असावें. हे विनंती. ये विशीचें उत्तर आपले कडील वकील पुण्यास असतील त्यांस खोलून ल्याहावें, ह्मणजे मजशी बोलून समजाऊन उत्तरें दाखवीत असें व्हावें. हें विनंति. पत्र १