Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ६४१
श्री.
१७२५ भाद्रपद शुद्ध १०
सेवेसी विनंती. सेवक बाळाजी रघुनाथ कृतानेक सां नमस्कार विज्ञापना तागायत भाद्रपद शु। १० मंदवार पावेतों मुकाम नागपुर वर्तमान यथास्थित असे. विशेष. आपणाकडून बहुत दिवस पत्र येऊन सांभाल होत नाहीं. तेणेंकरून चित्त उदास आहे. तरी, ऐसें नसावें. सदैव......पत्रीं सांभाल करीत जावें. यानंतरः आपली आज्ञा घेऊन स्वार जाहलों ते मौजे आकुळनेराकडून पैठणास आलों. तेथें वर्तमान ऐकिलें कीं, सरकारचीं वस्त्रें व जवाहीर व हत्ती श्रीमंत मन्याबापूपाशीं सेनाधुरंधर या पदाची घेऊन, नागपुरास सदाशिवराम गुणे यांस रवाना केलें होतें. त्यांस, का आंबडापुरीं पूर्वी शरीरीं समाधान नव्हतेंच, कामारी वायूचा उपद्रव होऊन स्वस्तिवडेगांवीं आले. तेथें उपाय केले. परंतु गुणावर न पडता देवाआज्ञा जाहाली. हें आपणांस कळलेंच असेल, त्याहावें ऐसें नाहीं. पैठणाहून दरमजल वर्धा उतरून सारवाडीस आलों. तेथें राजश्री मल्हारजी नाईक जासूद भेटला. त्यास विचारिलें की, तुह्मी पुणें पाहून निघाल्यास फार दिवस जाले असतां मार्गीच ! तेव्हां त्यांनीं सांगितलें की, सदासिवपंताचा काळ वडेगांवी झाला. हें वर्तमान पुणेयास श्रीमतांस लिहून पाठविलें. त्याचें उत्तर येई तोंपावेतों वडेगांवींच होतों. उत्तर आल्यानंतर, हत्ती वगैरे कारखाना घेऊन, नागपुरास जाणें. मागाहून लिहिण्यांत येईल तसे करणे. याजवरून सरंजाम घेऊन जातो. आम्हांस त्यांणी विचारलें, त्यास सांगितलें, त्याप्रांतीं पांच रुा येणें आहेत त्यास फार दिवस जाले, जाऊन उद्योग करावा. नंतर निघोन नागपुरास श्रावण शुा २ स दाखल जालों, रा सेनासाईबसुभा यांची व मुछ्दीमंडळी वगैरे यांची भेट घेतली. पत्रें दिलीं. भाषणें ममतेचींच जाहालीं. आपल्याठायीं लोभच दिसतो. कळावें. सा माहादाजी हरी यांणीं पेशजी कटकची सुभेदारी केली होती. ती हल्लीं राजश्री राजारामपंत करितात. मारनिलेस येथें मागील गोसावी व सावकार यांचा पेंच व अलीकडे पोटास वगैरे घेतलेयाचा गवगवा. नित्य उठोन धरणेंपारणें यांसी संबंध. याजमुळें श्रीमंत बापूसाहेब कृपाळू होऊन, फडनिशीचीं वस्त्रें वैशाखमासीं दिल्हीं. त्यापासून जातच आहेत. अद्याप पावेतों तेथील नेमणूक व कागदपत्र हातास आला नाहीं. त्यास, आतां चहूं दिवसांत येऊन निघोन जातील, ऐसें दिसतें. मीहि त्यांस ऐवजाविसीं जे बोलणें तें बोलिलों. त्यांणी सांगितलें कीं, जो प्रकार आहे तो कोणताहि लोपला नाहीं, दृष्टीस पडतच आहे. सांप्रत पैसा निर्माण व्हावयाचा दिसत नाहीं. रा अनंतभट चितळे यांजवर सरकारचा पेंच आला आहे म्हणोन रोहिले यांच्या पाहाण्यांत आहेत, त्याजकडूनहि सध्यां कांहीं येतां दिसत ( नाहीं ), मामलनी संबंधे पेंच आहे. तो उरकल्यानंतर जें घडेल तें खरें. उरकण्यास वर्ष साहा महिने पाहिजेत. याच अन्वयें सर्व ज्याकडे आपले पांच रुपये यांची दशा कांही चांगली नाहीं. मनुष्यमात्र खराबींत आहेत. त्याहि मध्यें या प्रांतींचा ऐवज वसूल विनादाबा शिवाय होत नाहीं. त्यास श्रीनें कृपा केली आणि श्रीमंत नाना व तात्या यांची कृपा संपादून घेतली, आणि वकीलीचें काम करून घेतलें, आणि पूर्ववतुप्रमाणें चालिलें ह्मणजे पांच रु। सहजांत वसूल होईल, येविशीं पुणेंयास विनंतिपत्रें दोन चार लिहिलीं आहेत, तेथें सविस्तर लिहिलें आहे. आपणांस कळलेंच असेल, कळावें लोभ किजे हे विज्ञप्ति.