Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)

पत्रांक ६४०

श्री.
१७२५ आषाढ वद्य ११

सेवेसी जिवाजी निराजी कृतानेक सां नमस्कार विनंती विज्ञापना ता। आषाढ वा ११ गुरुवार पावेतों मुकाम पागा कुंभारगांव वर्तमान यथास्थित असे. विशेष. आपण पत्र पाठविलें, तें पावलें. पत्रीं आज्ञा केली जे, गारदौंड येथें शामसिंग कंपू आहे. त्यास, इंदापुरी राजश्री धुळोजी हुजरे याजकडील विठलपंत आहेत. त्यांनीं दोन वेळा येथील खंडणी घेऊन, मागती स्वार पाठऊन, येथील चौगुली यमाजी बुमाल नेऊन बैसविला आहे. नित्य स्वारांचे खर्च घेतात, त्यास, मनाईचें पत्र घेऊन पाठवितों, ह्मणून लिा. त्यास, अद्याप पत्रें आलीं नाहींत. येथें तों नित्य उपद्रव आहे. आणि अलीकडे, राजेम्हमद तोफखाना आहे, त्याचा चुलतबंधू इभ्रामखान जितींत आहे, त्याजपाशीं पागा आहे. त्यांनीं येथील मोकदमाचे नांवें चिठी लिहून, तमाम कुरण जप्ती आपल्याकडे आहे, कुरणांत पागेचीं घोडीं वगैरे उपसर्ग न देणें, ऐसें लिहून पाठविलें आहे. ते व जिन्नस पत्र पाठविलें आहे, याचे बंदोबस्त लवकर करून पाठवावे. आह्मी येथून जितीस सगुभाईस बोलावयास पाठविला होता. तो पागा घेऊन इभ्रामखान करकंभोसें येथे गेला आहे. त्याचे कारकून होते त्यांनी सांगितलें कीं, भोसेंकडून चिठी आली कीं, तमाम कुरणें जप्ती करणें, त्याजवरून चिठी पाठविली आहे. नागपंचमीस गांवास येणार आहे. तुह्मी येऊन बोलावें, आह्मांकडे गुंता नाहीं, ऐसें सांगितलें. आपण तेथे सर्व बंदोबस्त करून, लवकर पत्रें घेऊन पाठवावीं. पाऊस थोड़ा बहुत पडला आहे. कुरणाची रखवाली करविली आहे. गवत आठपंधरा दिवसांनी होईल, हाल्ली घोड्यांस कडवल मका घेऊन चारितों. चरावयास घोडीं सोडिलीं आहेत. कंपूकडील गारदौंडाहून चिठ्या होऊन, तमाम आसपास कडबा म्हणोन खंडणी घेतात. त्याचेहि लवकर बंदोबस्ताविशीं पत्र पाठवावें. राजेमहमद याचे नांवचें पत्र इभ्रामभाईस मनाई व धुळोजी हुजरे यांजकडील विठलपंत कारकून इंदापुरीं आहे त्यास चिठी पाठवावी कीं, दोन वेळ घांसदाणा घेतला असतां, मागती मुंगीचे राजाचे खंडणी देणें ह्मणून स्वार पाठऊन यमा चौगुला धरून नेला आहे तो सोडून द्यावा, एकंदर गांवास उपद्रव न देणें, म्हणोन धुळोजी हुजरे याचें पत्र घेऊन पाठवावें. खिलारी याचे उपद्रव भारी आहे. दो चौं रोजांनी सगुभाईस राक्षसभुवनास ऐवज वसूल करून आणावयास पाठवितों. सेवेसीं श्रुत होय हे विज्ञापना.