Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)

पत्रांक ६४७

श्री.
१७२५ आश्विन शुद्ध १०

विजयमहामुहूर्तें पत्रें लष्करांत रवाना केलीं त्यांतील मजकूर स्मरणार्थ:-

१ येशवंतराव होळकर सुभेदार यांस कीं, फा। बहुल ४ मंदवारीं कोतवालाचें तळ्यानजीक मुकाम होता. तेव्हां रात्रीं चंद्रोदईं श्रीमहागणपतीचा उत्साह ब्रह्मांडभर त्यामुहुर्तें पांच गजांसह भेटीचा योग श्रीजगद्गुरूंचे शिष्यांचा व श्रीमार्तंडाचे भक्तांचा जाहला. प्रसाद व पत्र मस्तकी वंदून कित्तेक संतोषाचें शब्दरत्नेंकरून परस्पर भूतभविष्यादि वर्तमान श्रवण होऊन, समस्या पूर्ण जाल्या. नंतर, पंचमीस आज्ञेनुरूप होळकरांनीं होळीचा खेळ समाप्त करून, श्रीमंतांचे वाड्यांत जाऊन, आमची माता सीतादेवी वनवासाहून आली, त्यांचे दर्शन घेऊन समाधान करून, बहुमानाचीं वस्त्रें घेऊन, स्वार जाहला, रंग विशिष्ट पुरुष स्वस्थानीं नाहीं, म्हणून राहिला. तों अलीकडे श्रीरामनवमीस व्याचा जन्म, पितापुत्र एक राशीं एकासनीं बसल्या जनकौतुक ! पाटीलबावा रंग खेळतां पाहिलें. परंतु, गोटापर्यंत जाऊन उपहार बहुमानपूर्वक होणें राहिला. त्याचे हेतूपेक्षां शतगुणित होऊन, विश्व पाहून, सत्कीर्ति दिगंतरी जावी हे इच्छा, तें करणेंकरून श्रवण होतील, आपली स्वारी गेल्यामागें तवाई मोठी गुजरली, ते श्रीहरिहरानें रक्षिली ! त्या संधींत लहान शिशु होतें तें श्रीभानूस अर्पण केलें. त्यास घेऊन श्रीमहायात्रेस जावयाकरितां भा शु। १३ सोमवारीं श्रवण नक्षत्रीं वृश्चिक लग्नीं आठां ग्रहांचें बल जाणोन, प्रस्थान केलें. त्याचे तर्तुदीस आपण मनावर घेऊन, अल्पविषय आहे तो, वडिलांचे आज्ञेप्रों हिशेब करून, द्यावयाचा निश्चय केला, असें समजल्यावर इतर आपोआप देतील. त्यांस सूचना मात्र व्हावी. यादी अलाहिदा लिहिली आहे. त्या प्रों कोणास संज्ञा सांगेन पा दूरच्यास पत्र असावें तसें पा. म्हणजे सोबत पाहून, दर्शनास येऊन, नेक सला ज्या मार्गाची असेल तिकडून जाऊ. मर्जी नसल्यास, आमचें घर वसई भांडोन घेतली त्या दिवसापासून वसईच आहे. तिकडे सर्वांस भेटावयासीं जावेंच लागेल. तिकडूनच परभारें सुर्तेवरून श्रीनर्मदा शुक्रतीर्थाजवळ उतरोन, केशनखें पापाश्रित्य आहेत त्यांतें टाकून, पायागडावरून महेश्वर उजवें सोडून श्रीउजनी महाकाळाचें दर्शन घेऊन, पुढें विचार दिसेल तसें करूं. येविशींचे उत्तर पा. आणि वकिलासहि आज्ञा असावी. त्याप्रों ते व आह्मीं वर्तणूक करावयासी येईल.

पत्र १.