Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ६४४
( नकल )
१७२५ आश्विन शुद्ध १०
दौलतराव शिंदे यांस पत्र कीं: कैलासवासी पाटील बोवा तेरा वर्षे हिंदुस्तान प्रांतीं राहून श्री मारुती प्रों महापराक्रम करून प्रभुदर्शनास आले त्यासमईं होमहवन करून विध्युक्त भेटी व्हाव्या तें विपरीत जालें. परंतु पाटीलबावा श्रीनृसिंहासारिखा विलोकन करीत बसला आहे. आणि श्रीमंत कैलासवासी माधवराव नारायण मुख्यप्रधान आमचे जगत्पीते कोणी मेले म्हणतात. आह्मी तों कलेवर दहनच केलें. कोणी जिवंत म्हणतात. याचा निश्चय मजला होईना, आपलें त्यांचे परम ऐक्य होतें. निरोप जात येत होते. मी जाण आहें, आणि पाटीलबाबा महाज्ञानी देशीं आले. त्यास पत्रें भविष्याची श्री जगद्गुरूची प्रसादपूर्वक आलीं असतां, कारभारी यांणीं पावों न दिली. याची रुजवात हावी तर त्यांतील कोणी आहे नाहीं हेंहि नकळे. परंतु, राज. श्री कल्याणराव कवेली बापू सांगतां ध्यानास येईल. आपण नातु होतां ते पुत्रत्व पावलां. खर्ड्याची स्वारी फत्ते जाली. त्यापासून मेळविलें किती, हारविलें काय, याचा विचार दीर्घदर्शी यांणी करीत असावा. तसा केलिया अधिकार चिरकाल ज्याचा तेच करतील. मी वृद्ध, मी माहायात्रेस भानूस बाल अर्पण परम संकटीं केलें. त्यास घेऊन जावयाकरितां भा शु। १३ शुक्राचे अस्तापूर्वी प्रस्तान केलें. त्या रवानगीची तर्तूद सेनापतीकडे व ग्रहस्थाकडे ऐवज येणें. त्याचा हिशेब करून पैकीं निमे तूर्त रवानगीस देवऊन बाकी सोईसाईनें घेऊं. बहुत दिवसांचा कारभार, सरदारीस कधीं वोढ नाहीं, असें पाहिलें ना ऐकिलें ! परंतु अगत्य मात्र पाहिजे. आणि ज्याचें वाजवी देणें तें दिल्यानेंच बरें. हें अंतःकरणीं असावें, वरकड अकरा वर्षांचे मजकुराची माहितगारी प्रचीतपूर्वक चिरंजीव राजश्री गोपाळराव हरीबापू व चिरंजीव राजश्री सदाशीवराव बल्लाळ आपले पाग्ये होते.(त्यास) कौतुकानें विचारलें असतां विनंति करीत जातील. माझीं कामें त्रिवर्गांनी चित्तावर घेतल्यास केवळ सुलभ आहेत. हिशेब मात्र वाजवी रीतीनें करावयासी आज्ञा व्हावी.