Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)

पत्रांक ६४६

१७२५ आश्विन शुद्ध १०

रघोजी भोंसले यांस पुरवणी पांच कलमाची लिहून पाठविली त्याची नकल.

१ खेर्ड्याची स्वारी फते होऊन आलियावर गारपिराचे मुकामीं साडे साहा सुश्लोकें करून लिहून पत्र दिलें होतें. त्यांत सारांश:-हा छळवाद. त्या छळवादें करून अयादवी पृथ्वी जाली. तेथें ईश्वरास माधवाचा पाड काय ? त्याच पत्राचें आश्वासनावरून श्रावणी पौर्णिमेस चंद्रग्रहणीं वृष्टी जाहली, हें विश्व जाणतें. भेटीनंतर ध्यानास येईल. तो विवाद वृंदाकृष्णाचा कुटरूपें लिहिला आहे. त्याणीं आमचें शासन केलें. तसेंच श्रीद्वारकेच्या बेटावर टोपीवाले यांनी तोफा मारिल्या. त्या रागें स्त्रीपुरुषांनी ऐकून मुंबईचे घरास अग्न लाविला. हें विश्व पाहत होतें. तस्मात् अपराध ज्याचा त्याजकडून ईश्वर करवित असतो. त्याजवर पुन्हां सोंगाचे संपादनीस मोठी मजल करून वाघेलीचे मुकामीं एकादशीस आलां. तेथें मी भट पुढें येऊन, प्रथम भेटोन, स्नानसमई सांगोन, या स्वारीचा तीर्थोपाध्या मीच आहें, म्हणोन बोलोन, मागील पत्राचा मजकूर पुसिला. तों नागपुरास राहिले. ह्मणून उत्तर जालें होतें. संगमानजीक साहा महिने मुकाम जाला होता. त्यांत पांच सात वेळां दर्शनास कांहीं गुप्त कांहीं प्रगटपणें कार्यकारण जाणोन आलों. त्या समईं पूर्वपत्राची नकल दाखविली. ते अमात्यासह रामचंद्रपंत वकील वृद्ध यांणीं पाहोन, कांहीं आश्चर्य कांहीं कौतुक मानिते जाले. त्या समईं सिकारी प्रकर्ण दाखविलें व बोलिलो. त्यांत तात्पर्यः-मोठे मोठे शूर शूर सरदार लोक शिकारीस जात असतात. त्यास ज्याणें हेर दाखविली तो बक्षीस मागतो व प्रथम ज्याणें हतियार लाऊन सावज जखमी केलें, लंगडे जालें असतां मागाहून हुताशनीचे खेळासारखें आलें, त्याजवळ विभाग मागता. ह्मणून फिर्याद श्रीनगरीं अमरांचा सेनापतीसमान षण्मुखी सेनासाहेबसुभा, समवेत घिदूर सर्व राजनीत जाणते, चतुर, पंडित तिहीं समुद्राचें एकवटलें. ते राजासीं व छत्रपती व नाना नरेंद्राचेच वंशाचे. इच्छा करणें तें कांहीं मनास आणून जें ज्यांचें उचित तें त्यांचे त्यास देवऊन आपलाले नगरास जाणें उचित. नाहीं तरी, अपराजितमुद्रा सुमुहूर्ते जाहालेली जारीच आहेत. माधवाची माधवांस माधवांत माधवासहित वडिलांचा मान बहु. सचिवाचे रीतीप्रों द्यावयाचा होता तें विपरीत कां जालें ? व घोडा प्रासादिक नजरेचा आला, तो नजरेनें पाहून शिष्यांचेच हवालीं केला. त्याचा खर्च पागेचेच अन्वयें येईल तसा येईल. टोळ पतंगासारिखे अनंत पूर्वेकडून येऊन समुद्रास भेटू गेले. त्याचा प्रश्न केला होता. तेच हे माघारी द्वारकानाथानें पा. उभयदळी प्रचित. सत्यमिथ्या दर्शनांतीं खातरजमा होईल, सांप्रत, वैशाखमासीं गोविंदराव दिवाण वैष्णव यांची भेट भांबवडेयास जाली. सहज बोलतां, श्रीद्वारकेचें प्रकरण निघाले. त्यांत, त्यांचें धन्याचें नांव पुसतां, साहेब वसली ह्मणतां सहज येऊन फसली, असें श्रीगुरुमुखांतून वर्ण निघाले, त्यास साक्ष उभय आहेत. समय विशेषें भेटोन कळवितील, व सिकारी प्रकर्ण लिहान दिल्हें. तें पाहोन कोठें ठेविलें. परंतु मालोजी घोरपडे, आमचे सरकाचे मानकरी, त्यांचे घरीं उमयतां बंधू मेजवानीस गेला. घोडा मर्जीस न आला. ते खूण. त्या समईं सिकारीप्रकर्ण दोन बंद लेहून दिल्हे आहेत. प्रयोजन ज्यास आहे ते पाहू. परंतु प्रसन्नतेनें बोलणें. किंवा तरह तुह्मीं रामभक्त असतां न मिळाला. मी जोसी पातडें घेऊन बहु दिवस फिरलों. त्याचें सार्थक होण्यास लवहि नलगे. परंतु पांथिकाचे छायेचीं झाडे गेलीं. त्यांस बहुकाळ लागेल.

१ श्री माहायात्रेस जावयाचा मजकूर पत्रीं लिहिलाच आहे. त्यांत पितरांसह देवत्रयांस ज्याणीं निरपराध गांजल्याचे दस्तऐवज ज्याचे असतील त्याजकडील संसर्गहि लोगों नये. तरच कळ्यावर
.

१ गयावर्जनाच्या साहा असामी निपुत्रीकी. त्यांची नांवनिसी:-

फडके तीन ३. त्यांत पुत्र असोन             त्रिंबक नारायण मनोहर सुभा अ
आचार नाही आणि दत्तपुत्राचा अर्थ         हमदाबाद, ज्याणी कोटी तुळशी श्री.
विश्व जाणते, त्यापेक्षां धर्मपुत्रच बरा.        द्वारकेचे देसास अर्पण करावयाचा
भानु सतेज होता. त्याचे जाल्या              संकल्प केला.
स पुन्हां सतेज होईल.                         श्रीमंत माधवराव नारायण, आमचा जगत्पिता.

हे चैन पडों देत नाहीं. त्यामुळें मोठी उत्कंठा लागली आहे. घटी युगासम जाते. मी वृद्ध आणि परम संकटीं ! भानूस शिशु अर्पण केलेले. अति: लालनपालन करीत नेलें. पौ, त्यास सुखासनीं बसोन शीतउष्णक्षुधातृषासह सर्व समृध्धी. भयाची बाधा न होतां, मार्गी जातां जातां कालक्षेपार्थ ज्याची जे आवड ते पुरविली पाहिजे जे.

१ वृद्धास रागी, बागी, पारखी, नाडी, और न्याय ! उस पंचको गुरु है
उमजत अंग सुभाव ।। १ ।।

१ बाळास नाना प्रकारचे खेळ पाहिजेत.

१ बुद्धीमुळें समक्ष परोक्ष खेळणारें.

१ नरदा चहूं रंगाच्या च्यार च्यार. परंतु दोन बाजू समान. त्यांत जग न करितां एकटे निर्बळी सांपडलें तरी घेऊन खेळ जमवावा.

१ गंजिफा, चंगा राणी कोण होती ? तिणें कल्पना केली ती मोठ्या मोव्यांनीं मान्य केली. तितक्या सर्व पानांवर नजर ठेऊन आपली आगळीक. १ ढाल तरवार, सर्व शिलेखाना अश्वासह असिषें.

या खर्चास पैका ज्याचा त्यांणीं ठेविला आहे. समजाऊन देईन. त्यास ताकीद मात्र जाली पो. ह्मणजे सव्याज देतील.

१ परसराम नो अनगल सातारकर यांचें कर्ज आपले वडिलांचे वडिलांकडे येणें बा खत. त्यांस त्यांचें घर पुण्यातील माझें कर्जांत गुंतलें आहे. त्यांणीं शिक्यानिशीं आपलें खत दाखविलें. आणि त्यांचें चिरंजीव सदाशीवनाईकही गयावर्जनाकरितां येणार. त्यास, खतांपैकीं. आदा जाला असेल, तो वजा करून बाकी लेखाबा हिशेब होईल तो दिल्या. उभयतां स्वर्गगामी होतसें करावें. श्रीमंत कैलासवासी थोर माधवराव बल्लाळ मुख्यप्रधान स्वामी याणीं कर्जाचा हिशेब चहूं पिढ्यांचा पाहून, त्यांचा हवाला रामचंद्रना परांजपे यांचा देवऊन, फेरिस्ताप्रमाणें खतें पाहून, फाडून टाकून, सर्वांचा निरोप घेऊन रमासहगमन करून, कीर्ती मोठी संपादिली ! त्या काळीं जानेजीबावा थेऊरास आले होतेसें वाटतें. त्यांणींच खत लेहून दिल्हेलें पाहिलें आहे. उदार हात तर पुण्य आणि पुरुषार्थाची सत्कीर्ति लोक गातील. सरदारीस वोढ कधीं नाहीं, ऐसें ऐकिलें ना पाहिलें !

हीं पंच कलमें. यांत प्रचीतीही आहेत. ती राजश्री होळकर सुभेदार यांहीं पाहिल्या उपयोगीं. आणि तिघे एकरूप जाले असल्या कल्याणदायक आहे.

आश्विन शुा १० शके १७२५.