Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)

पत्रांक ६४८

श्रीलक्ष्मीकांत.
१७२५ कार्तिक शुद्ध १

पुा राजश्री नारायणराव वैद्य गोसावी यांसीः-

दंडवत विनंती उपरी. कारभारी यांचे प्रकर्णी सरकारचे मनांत येऊन, राजश्री नारायण येशवंत यांणीं लिहिलें हें फार चांगलें आहे. यांतून पुढेमागें उपयोगहि आहेत. ईश्वरें सर्वज्ञता दिल्ही आहे. याजवरून, मी आपले जागीं खातरजमा पक्की ठेऊन आहें. यांतील कित्तेक तपशील मशारनिलेस लिहिला आहे. ते विनंती करतील, म्हणोन लिहिलें तें कळलें. व मशारनिलेनींहि ते मच्याप्रमाणें तपसीलेंकडून विनंती केली. त्यास, जैसे तुमच्या लिहिण्यांतील बेत होते, त्याचअन्वयें एकएक प्रकार उगवण्यांत आला आणि उत्तरें समपंक लिहिलीं आहेत. तुमचे लिहिण्यांत कोणते एक उगवण्यांत गुंता ठेविला नाहीं. काय अडचणीचे प्रकार आहेत ते आपले आपल्यास सोसून, माणसाचे अवताब राखून, आपलें करणें द्रिष्टीस पडावें. व या करण्यांतून ऐसा फायेदा, हा लौकिकीं दिसावा. याचे पोटांत सर्व कांहीं समजतील. व अहोरात्र काळजी या गोष्टीची बाळगून आहों, ती दूर होईल. व असें करण्यांतून उपयोग मागें पुढें आहेत. हेंच जाल्यावर, सहजच आपलें करणें सर्वांचे नजेरेस आलें. मग, या संतोषाएव्हडा दुसरा संतोष नाहीं. अहोरात्र हीच विवंचना व साहस करून असों. तुह्मी या वागणुकींतील. तेव्हां इतकेंहि करून दाखवाल याच अर्थी ऐशा रीतीनें परस्परें हा योग आपले बुद्धीकडून ठेविला आहे. ईश्वर तैसा दिवस सर्वांस समजावयाजोगा कधीं आणील ! कारभारी यांसी आजवर जीं जीं बोलणीं जालीं, व ते जे जे प्रकार बोलले, व उपयोग करून देण्याचें झटलें, ते ते सर्व तुमच्या ध्यानात आहेत. येथून कोणताएक गुंता व लिहिण्यास बाकी ठेविली नाहीं. आतां एवढें करण्यातून काय उचित असेल तें करून दाखवावें. ही कळकळ तुमची तुह्मांस असावी. येविसींचे मजकुराची आज्ञा व संभाषण जें करावयाचें तें राजश्री नारायेण येशवंत यांसीं केलें आहे. त्याप्रमाणें ते तुम्हांस लिहितील, त्याजवरून कळेल. व राजश्री सदाशिव बापूजी यांसी जे जे प्रकार लिहिले आहेत त्यांचें मनन होऊन त्यांचीं उत्तरें समर्पक यावीं. हें सर्व तुह्माकडेस आहे. येविशीं+ल्याहावें, ऐसें नाहीं. रा छ २९ माहे जमादिलाखर. हे विनंती, मोर्तबसुद.