मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)

पत्रांक ६४३

( नकल )
१७२५ आश्विन शुद्ध १०

दौलतराव शिंदे यांस की: कैलासवासी पाटीलबावा तेरा वर्षे हिंदुस्तान प्रांतीं राहून, श्री मारुती प्रमाणें महापराक्रम करून, प्रभुदर्शनास आले. त्या समईं होमहवन करून, विध्युक्त भेटी तें विपरीत जालें ! परंतु, पाटीलबावा श्री नरसिंहासारिखा विलोकन करित बसला आहे आणि श्रीमंत कैलासवासी माधवराव नारायण मुख्य प्रधान आमचे जगत्पिते हे कोणी मेले ह्मणतात. आह्मी तों कलेवर दहनच केलें. कोणी जिवंत ह्मणतात. याचा निश्चय मजला होईना. आपलें त्यांचें परम ऐक्य होतें. निरोप जात येत होते. मीं जाण आहे. आणि पाटीलबावा महाज्ञानी, देशीं आले. त्यास, पत्रें भविष्याचीं श्री जगद्गुरूचीं प्रसादपूर्वक आलीं असतां, कारभारी यांणीं पावो न दिलीं, याची रुजुवात हावी तर त्यांतील कोणी आहेत नाहीं हेंहि न कळे ! परंतु राजश्री कल्याणराव कवेली बापू सांगतां ध्यानास येईल. आपण नातु होता. तें पुत्रत्व पावलां. खर्ड्याची स्वारी फत्ते जाली, याजपासून मेळविलें किती, हारविलें काय, याचा विचार दीर्घदर्शी यांणी करीत असावा. तसा केलीया अधिकार चिरकाळ ज्याचा तेच करतील. मी वृद्ध, श्री महायात्रेस श्री भानूस बाळअर्पण परम संकटीं केलें. त्या घेऊन जावयाकरितां भा शुद्ध १३ शुक्राचे अस्तापूर्वी प्रस्थान केलें. त्या रवानगीची तर्तूद सेनापतीकडे व गृहस्थाकडे ऐवज येणें त्याचा हिशेब करून पैकीं निमे तूर्त रवानगीस देवऊन, बाकी सोई सोईनें घेऊं. बहुत दिवसांचा कारभार. सरदारीस कधीं ओढ नाहीं, असें पाहिलें ना ऐकिलें. परंतु अगत्य मात्र पाहिजे. आणि ज्याचें वाजवी देणें तें दिल्यानेंच बरें, हें अंतःकरणीं असावें. या पत्रांचे उत्तर पुण्यातील वकीलासह मजला असावें. वरकड़ अकरा वर्षांचे मजकुराची माहितगारी प्रचीतपूर्वक चिरंजीव राजश्री सदाशीराव बल्लाळ आपले पाग्ये होते (त्यास ) कौतुकानें विच्यारिलें असतां विनंति करीत जातील. माझीं कामें त्रिवर्गांनी चित्तावर घेतल्यास केवळ सुलभ आहेत. हिशेब मात्र वाजवी रितीनें करावयासी आज्ञा व्हावी. ऐवज सोईवार दाखवून घेईन, सरकारनुकसानी करावयाची नव्हे, एकादा शब्द अयोग्य लिहिण्यांत आला, तरी मी वेड्यासारिखा. केश, नखें, वाढविलींच आहेत. त्याचे बोलण्याचा व लिहिण्याचा राग कोणासही घेऊं नये. मार्गांचें दस्तक आणि उत्तर यावें. ह्मणजे सोबत पाहून दर्शनास येईन. मर्जी नसिल्यास वसईस माझें घर, वसई घेतल्यापासून वसईच आहे. तेथें भेटावयासी जाईन. तेथून सुरतेवरून श्रीनर्मदातीरीं शुक्रतीर्थी केश नखें श्रीत्यपापें आहेत, ती टाकून पायगडाकडून उजनीस माहाकाळ पाहोन पुढे जाऊं. पत्र १

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries