Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)

पत्रांक ६०५

श्री.
१७२४ आश्विन शुद्ध अखेर
.

श्रीमंत राजश्री वैद्यबोवा मोकाशीसाहेब, साहेबाचे सेवेसी:-

अर्जदास्त अर्जदार बंदेगी शरीकर मोकदम मौजे कराठी प्रां। सुपें दंडवत अर्ज विनंति विज्ञापना कीं, मौजेमारचें वर्तमान तरः शेतमळे झाडून लुटले गेले कांहीं एकदोन मळे राहिले होते. गणपतराव पानसे यांच्या मुकामामुळें तेहि नवमीचे दिवशीं कूच करून गेले नंतर दस-याचे दिवशीं झाडून कही आली. त्याही मळ्याचा फडशा जाला. खरीफाचीहि अवस्ता तीच जाली. रब्बी पेरावी तर प्रजंने नाहीं. यामुळें दोन्ही पिकांची निराशा जाली. मान्याचे लष्कर पूर्वेस बारामतीचे खालते सा कोसांवर आले. जरीपटकाही आज एकादशीस कूच करून बारामतीवर गेले. मान्याचे धास्तीनें गांव झाडून वस झालें. आपल्याभोंवते लोणीमोरेश्वर येथील वस्ती आहे. याजवेरान शेवेसी अर्जविनंति लिहिली. गांवचा धर सुटला आहे. आपली आज्ञा तर, गांव वस करू नये. त्यास, खंडनीचे रोखे मान्या मनसरी करितो. पैसा द्यावयास ताकत नाहीं. गांव क्सबा, तर जाळतो. ऐसें संकट प्राप्त झालें आहे. येविषईंची आज्ञा येईल, त्याप्रों वर्तनूक करू. येथें तर घटकेचा भरवंसा नाहीं. कळावें. सेवेसी अर्ज विज्ञापना. दहाकाचा बंदोबस्त करावा. दोनसे रुो गांवच्या बच्यावाकरितां कृपा करून रा नारोपंत नाना यांसी पाठवावे. वितके दिवस गांवच्या बच्यावाचा लौकिक जाला. आताही आमचा संकटाचा प्रानअवस्ताचा दिवस आहे. साहेबीं ये येळेस कृपावंत होऊन दोंशां रुपयाचें काम करावें, म्हणजे श्रमाचे पाडऊ होऊं. निआधारी झालों, याकरितां संकटाची अर्जदास्त पाठविली आहे. हे अर्जविनंति.

१ धाकाचा. दहशतीचा. २ प्राणावस्थेचा. ३ गुलाम, ४ निराधार,