Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ६०३
श्री.
१७२४ आश्विन शुद्ध १२
चिरंजीव राजश्री विसाजीपंत नाना यांसीं बापूजी गणेश साठये आशीर्वाद उपरी येथील क्षेम ता। आश्विन शुद्ध १२ येथें सुखरूप असों, विशेष. तुह्मां कडून बहुत दिवस पत्र येऊन वर्तमान कळत नाहीं. समाचार घेत नाहीं. तरी असें नसावें. सदैव पत्र पाठऊन संतोषवीत जावें. इकडील मार गांवच्या पत्रावरून कळेल. होळकराकडील मान्या व श्रीमंतांची फौज यांस च्यार कोसांवर अंतर आहे. सरकारची फौज बुनगे बारामतीस येऊन, पुढें सड्या फौजा होऊन गेल्या आहेत. बारामतीस वस्ती आहे. गांव दहशतीनें उज्याड जाहलें. हा गांव उज्याड होणार. मुलें माणसें सुद्धा येथें आहों. छत्राकडील काम आम्हाकडे सांगितलें आहे. लष्करचा भरंवसा नाहीं. घरांत भांडे व चीजवस्त आहे. ती गेली म्हणजे कठीण. याजकरितां यजमानास विनंती करून अगर तुमच्या विचारास येईल त्याजप्रों उत्तर पा।. ती। राजश्री दादा कोठें आहेत ते लिा. बहुत काय लि। ? लोभ करावा. हे आशीर्वाद.
हें। पत्नीं हावलदार व नारोपंत यांस सां नमस्कार सांगावा.