Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ६००
श्री. ( मतलब. )
१७२४ भाद्रपद
यादी मतलब सीतलगीर गोसावी पो। पाटण प्रांत गढेंमडलें.
१ पो। पाटण येथें आमची लेवादेवी वडिलांपासोन गला व नगदी दीन वगैरे लोकांकडे येणें आहे. त्याचा तगादा आह्मीं करूं. जसें जेथून निघेल, असामीची अबादी राहून, तसें घेऊं. येविसीं सरकारचा पक्ष असावा. कलम.
१ मंडल्याचे संस्थान जेव्हां राज्याकडे होतें तेव्हां पामजकूरची मामलत आह्मांकडेच होती. ते वेळेस आमचा मठ वगैरे राहाणें गढींतच होतें. नंतर संस्थान सागरवाले यांणी घेतलें. त्या वेळेस आह्मीं निघोन काशीस गेलों, तें आज वीसपंचवीस वर्षे तेथेंच आहों. सांप्रत पा सरकारांत आला हें ऐकून एथें आलों. त्यास, कसबें पाटण येथें आमच्या मठाची योजना करून, जागा बांधावयास परवानगी द्यावी. दोन तीन बाग आमच्या वडिलांचे हातचे आहेत. ते आमचे आह्मांकडे देवावे. कलम.
१ वस्तीमधें आह्मीं राहिल्यावर चार रुपये व नाजपाणी देणें घेणें करूं, येविशीं सरकारचा पक्ष असावा. कलम.
१ कसबें मजकुरीं आह्मीं राहिल्यावर, दाहा पंचवीस अतीत आम्हांजवळ राहतील. तेव्हां सरकारांतून कांहीं निर्वाहा आमचा चालावा. आह्मीं सरकारचे उपयोगाचे आहों. हरएकविशीं चाकरी सांगितल्यास करूं. कलम.
१ आमचे राहणें कसब्यांत जाल्यावर च्यार सुष्ट आहेत व च्यार दुष्ट आहेत. आपलेकडील कमावीसदार तेथें आहेत. त्यास आमचे प्रतिपाळाविशीं निक्षून आज्ञा असावी कीं, हरएकविसीं यांचा सांभाळ करावा, कोणाचा उपद्रव वगैरे वाजवी लागूं नये. म्हणून कलम.