Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ६०९
श्री.
१७२४ आश्विन
भाई नाना दिक्षितः-
पंडत साहेब बिसियार मेहेरबान अजतरफ महमदशाहखां सलाम नियाज़ आके तुह्मी खातरजमेने येथें येणें. तुमचे व आमचे मध्यें कुरान व गंगाजी आहे. कोनेहि विशई दगाफटका होणार नाही. व जे रुा। आमचे बाकी राहिले, त्याचा बंदोबस्त करून पाठविणें. व तुह्मी जरूर जरूर येथें येणें. मागती औरंगाबादेस जाणें असलें तर जावें. खातरजमेनें यावें. कांहीं वसवास न करावा. व ज्या वेळेपासोन हें लष्कर येथें आलें किती बंदोबस्त घराचा व गांवचा करारवाकी लोक वे कोनीहि तुमचे असबावास हात लावित नाहीं. मा। ऐवज बाकीचा द्यावा. नाहींतर मुखत्यार आहांत, तुह्मी येथें आले, म्हणजे ऐवज तनखाचा आमचा वसूल होईल तो घेऊं, व पेहेरे वगैरे अवघे उठून घेऊन जाऊ, व पुढेंहि मानसें रखवालीस गांवच्या ठेऊ, व हरएकाची खातरजमा करुन देऊं. व अगर तुह्मी हाजर न व्हाल व रुा। न पाठवाल, तर तुमचा अंमल गांवांत बसणार नाहीं व आतां ज्या पैस्याचा करार लक्ष्मण बापू याणें केला तो पैसा आह्मी घेऊं कळावें हे किताबत.