Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)

पत्रांक ६०२

श्री.
१७२४ आश्विन शुद्ध १२

सेवेसी नारो कृष्ण दोन्ही कर जोडून सां नमस्कार विज्ञापना तो। आश्विन शुद्ध १२ पर्यंत मुा। मौजे काराठी सुखरूप असों. विशेष. आपण आज्ञापत्र माहाराजाबरोबर पाठविलें तें पावलें. लिा सविस्तर कळलें. मौजे मजकूरचें वर्तमान तरः गांवचीं शेतेंमळें तमाम, लष्करें नजिक होतीं, त्यांणीं कापिलीं. बहुत नाश जाला. हालीं लष्करें येथून कूच करून जळगांवांवर गेलीं. बुधवारी दोन प्रहरा रात्रीं कूच्य करोन, बारामती व मेंढध्याचें मधें बुणगें ठेऊन, सड्या फौजा पुढें बारामतीचे नजीक काठेवाडीवर गेल्या. माने यांचे फौजेस व सरकारचे फौजेस दोन कोसांचे अंतर आहे. त्यांचीहि जमात वीसपंचवीस हजारपर्यंत आहे, म्हणोन वदंता आहे. येथें चीजबस्त आहे. त्यास, बहुतेक गांव उज्याड जाहलें. येथील मार तरः च्यार रु। सिलक जवळ बाळगोन राहणें तेव्हां ठीक व गांवचाही बंदोबस्त राहील. त्यास, सिलक तो मजजवळ नाहीं. व गांवांत पट्टी करावी. हरएक पीक अगदींच गेलें. पुढे दुसरे पिकावर च्यार रु। तुह्मापासोन घ्यावे तर गांवची वस्ती होणें कठीण. त्यास, गांव राहे तो अर्थ करणार स्वामी समर्थ आहेत. येविशींचें विनंतिपत्र गांवकरी यांणीं लिहिलें आहे. त्याजवरून श्रुत होईल. दंगा बहुत आहे. त्यास, छत्राकडील भांडी वगैरे येथें आहेत. त्यास, येविशींची आज्ञा यावी. वरकड मार अधिकोत्तर नाहीं. सेवेसीं श्रुत होय. हे विज्ञप्ति.