Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ६०१
श्री.
१७२४ आश्विन शुद.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री गंगाधरराव गोविंद स्वामी गो। यांसीः-
पो। बाजीराव रघुनाथ प्रधान नमस्कार विनंती उपरी येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहित जाणें. विशेष. बळवंतराव माधव, माधवराव अनत रास्ते यांचे पुत्र, पुण्याहून निघोन जाऊन होनवाडास जमाव करीत आहेत. सबब, त्यांचे पारिपत्यास डफळे व थोरात व वागमारे व पोळ यांस फौज व पायदळ जमा करून एकत्र होऊन जावयाची आज्ञा केली असे. तरी तुह्मीं पत्र पावतांच फौज व पायदळ जमा करून, सारे एकत्र होऊन, बळवंतराव माधव यांस हस्तगत करणें आणि हुजूर पोंहोंचाऊन देणें. जाणिजे छ ५ जमादिलावल, सुा। सलास मयातैन व अलफ, बहुत काय लिहिणें ? हे विनंति.
श्री राजा शाहूनरपति हर्षनिधान बाजीराव रघुनाथ मुख्य प्रधान.