Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ६०८
श्री.
१७२४ आश्विन
यादी रामचंद्र दीक्षित व लक्ष्मण नारायण दीक्षित कायगांवकर यांचा फडव्या निज्याम व नवाजजंग यांजकडून होणेः-
१ कायगांवीं पठाणांची फौज येऊन गांवांतील ब्राह्मण धरून मारहाण करून पस्तीस हजार रुपये खंड ठराऊन निकड मांडिली. गांवकरी यांणीं गांवांत पट्टी करून पंचेवीस हजार रु। दिल्हे. दाहांस जागा नाहीं. सबब दोघे ब्राह्मण पठाणाकडील दोन माणसें समागमें घेऊन आवरंगाबादेस आले. ब्राह्मणांचें वर्तमान ऐकून विचार केला कीं, इतःपर जो पैसा देणें तो मातबर मध्यस्तीच्या विद्यमाने देऊन, घरें, वाडे जगऊन पुढें उपद्रव लागूं नये. या भावीं सुभे यासीं बोलावें. ऐसी योजना करीत असतां, इतक्यांत सुभ्याकडील पांत्तपंनास जमाव येऊन घरावर दंगा करूं लागले. दरवाजे बंद करून, सुभे याजकडे बोलावयास ग्रहस्त पाठविले. तेव्हां, सुभे यांणीं सांगितलें कीं पांच हजार रु। ऐन व एक हजार दरबारखर्च, एकूण साहा हजार रुा द्यावे. पठाणाचें कूच करीवतों, ब्राह्मण त्याणें धरले आहेत ते आणून आवरंगाबादेस तुमचे हवालीं करतों. याप्नों बोलणें नेमांत येत आहेच, तों तेच समई इकडे वाडियावर सुभेयाची जमीयत आली होती त्यांनी बायका बाहेर काढून चावडीपुढून लष्करचे बाजारात गेल्या. हें वर्तमान आनंदराव निा। लक्ष्मणराव पेषकर यांजला समजलें. त्यांणीं सुभे यासीं बोलून बायका सोडऊन आणवून घरीं पाठविल्या, सुभे यांणी साहा हजार रुाचा दस्तऐवज लिहून घेतला. त्यांत लिहून दिल्हें आहे, बशर्थ बंदोबस्त कायगांवचा. तें पत्र पाहिलें असतां मारि ध्यानास येईल, अस्तु ! सुभे यांजकडून पठाणाचा बंदोबस्त कांही एक जाला नाही. आह्मीं सुभ्याच्या भरोंसियावर बेफिकीर बसलों, तिकडे पठाणांनी वाडे लुटोन, लाखों रुपयांची चीजवस्त नेली. ब्राह्मण व मातुश्रीबाईस धरून घेऊन गेले. बाईपाशीं कांहीं नाहीं समजोन, ब्राणह्मस. हित बाईस पठाणांनी सोडलें. इकडे सुरतवाले यांणीं जमीयत पाठऊन सातारियास वाडे लुटून चीजवस्त गाड्या भरून पैठणदरवाज्यानें शहरांत आणिल्या. तिकडे बाई लष्करांतून येतांना सुरतवाले यांचे वकिलांनी अडविलें कीं, तुमचे सुटकेनिमत्य पठाणांसीं एकवीस हजारांचा करार करून हवाल्यांत आलों ते द्यावे. ऐसी निकड करून एकवीस हजार रुपयांचा दस्तऐवज करून घेतला आहे. याप्रमाणें वर्तमान आहे. त्या प्रकरणीं त्याजकडून फडच्या व्हावा.
१ साहा हजारांचा दस्तऐवज माघारा यावा.
१ एकवीस हजारांचा दस्तऐवज माघारा यावा.
१ * +++ चीजबस्त कुल माघारी यावी.
------
३
१ डुकरखोरा पहाड सातारियाचे राणांत आहे. तेथें आमचा रमणा आहे. येविशीं सरकारची सनद असतां, हालीं औरंगाबादेकडील आहे, ह्मणून आपण घेतात. आह्मांस गवत घेऊं देत नाहीं. त्याविशीं ताकीद होऊन पूर्ववतप्रमाणें चालावें.