Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ६०७
श्री.
१७२४ आश्विन वद्य २
विज्ञापना ऐसीजे, राजश्री व्येंकटराव यांची भेट जाहाली. तिकडीलइडील सर्व भाव समजलें, श्रीमंताच्या चिठ्या चहूंकडे जातात. दाहा पांच जण मध्यस्त पडले आहेत. एवंच अद्याप जें आहे तेंच आहे. रा। बाजीराव बरवे व पाराजीपंत यांणीं मोठे प्रातःकाळीं होळकराकडे जावें आणि खातरजमा करून घ्यावी, ऐसें श्रीमंतांचे विचारें ठरलें. तेव्हां पाराजीपंतांनीं याजकडे सांगून पा कीं, याप्नों तेथून चिठ्या आल्या, आतां माझा उपाय नाहीं, तुमचा गृहस्थ गेला त्याचें उत्तर कळावें, प्रहर दिवसपर्यंत वाट पाहतों. त्याजवरून राहिले आहेत. त्यास, अझूनहि पहिलेसारखी व्यवस्था जाली म्हणजे कोणतेहि घडत नाहीं. मातबर मध्यस्ताचे हातें समेट जाहल्यास फार उपयोग. दादा ! काय कोठवर ल्याहावें ? नगरावर फौज रवाना होणार. होळकरानें हा कालमर्याद श्रीमंताचे पायासीं अमर्यादा केली नाहीं. जेव्हां अंबा-या दृष्टीस पडल्या तेव्हां घोड्याखालीं उतरून नमस्कार केला. फौजेस ताकीद केली कीं, कोणी श्रीमंताचे फौजेकडे जाऊं नये. मीं आपलें तोंडास काळें लाऊन घेणार नाही., माझा अव्हेरच केला तर मी लाच्यार आहे वगैरे बोलणीं व चाली पत्रांत कोठवर लिहूं ? सारांष, समेट करून घ्यावी, हे सलाह पक्षपात कोणाचाही करू नये. दौलतीवर लक्ष, ज्या गोष्टीनें दौलतीचें कल्याण. सर्व प्रजा आशीर्वाद देईल. समेट करून घेतली असतां, श्रीमंतांची चाकरी होळकर करून दाखवील, ऐसें आहे. गणोबा अद्याप आला नाहीं. वाट पाहतात. राघोपंत रात्रीं पावला, वेंकटराव यांणीं चिठी वडिलांस लिहिली आहे, त्याजवरून कळेल. ज्यास्थळीं आहां तेथून अन्यत्र स्थळीं जावयाचा विचार मसलतगार यांचे विचारें दिसतो. त्यास असें जाहलें म्हणजे सर्वहि गोष्टी बिघडल्या. पक्केंपणें मनांत यावें. मग कोणाच्यानेंच कोणताच विचार घडावयाचा नाहीं. इतके दिवस मसलतगारांनी मसलत दिल्ही. त्यांतून हे निघाले. पुढें अणीक असें घडल्यास ईश्वरेच्छा म्हणावी. मग मनुष्याचा उपाय राहिला. पुढें कोणास आपण दोष ठेऊं म्हटल्यास, दोष. घेणार नाहीं. इतःपर मर्जी. कालचे चिठीचें व या चिठीचें उत्तर मनन होऊन लवकर यावें, अज्ञानपणें माझें लिहिणें पडत असलें, तर विचार करून विनंति करावी. रा। बुधवार, प्रातःकाळ, प्रहर दिवस हे विज्ञापना. इ. इ.