Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)

पत्रांक २६६

श्री.
१७०३ चैत्र

xxx ( पल ) टणाचें पारपत्य करून नेस्तनाबूत केले असतील. इकडील मजकूर तरी गाडरनामें इंग्रेज वसईचा किल्ला घेऊन हावभरी होऊन, बोरघाटाच्या माथां येऊन, अडचणीची जागा धरून बसला आहे. त्यास, इकदील फौजा राजश्री हरी बल्लाळ व तुकोजी होळकर त्याचे तोंडावर आहेत. नित्य सडे जाऊन, तोफा नेऊन लागू करून, तोफांचा व बाणांचा मार करितात. दाहा वीस माणूस जायां होतें. घांटाखाली रा परशराम रामचंद्र यांस दाहा बारा हजार फौजेनिशीं पाठविलें. दोन तीन लढाया करून रसदा लुटिली, लोक मारिले, बंदुका वगैरे आणले, व त्यांची रस्त बंद केली आहे. त्याच्या करांत लष्करांत माहागाई आहे व लोक नित्य गोरे व काळे कवाइतींत दाहा पांच नित्य येतात. मैदानांत येता तरी ठीक होतें. त्यास त्यांच्यानें पुढें येवत नाहीं. याचें पारिपत्य लौकरच होईल, अकीटप्रांतीं इंग्रेजांनी कित्तेक ठाणीं, मुलूख घेतला होता. त्यास हैदरखान बहादूर यांणी तिकडे जाऊन, अर्कोट घेऊन फुलचरी व चैनपटण वगैरे जेर केलें. व फरांसीस खानमारनिल्हेनीं आणून इंग्रेजांस जरबेंत आणिला आहे. सारांश, तुम्ही तिकडील पलटणांचे पारपत्य करून हटविलें, पळविलें, किंबहुना पारपत्यही केलेंच असाल. तुह्मांकडील इभ्रतीनें इंग्रेजांची कंबरच बसेल. तुम्ही मातबर सरदार, मातबर मनसुबे करून कित्तेक शत्रू पराभविले. तेथें इंग्रजांचा मजकूर काय ? इंग्रेज साहुकार असतां, त्यांणीं शिपाईगिरीची उमेद धरून लढाईचा कस्त धरितो ! तरी काय चिंता आहे ? तुह्मीं त्याचें पारिपत्यच करालच. तीर्थस्वरूप कैलासवासी नानासाहेब व राऊसाहेब पुण्यवान. त्यांचा आशीर्वाद आमच्या मस्तकीं आहे त्यांचे आशिर्वादें व श्रीकृपेंकरून शत्रूचा पराभव होईल.* *