Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)

पत्रांक २३६.

श्री.
सदरहू प्रमाणें हरीपंत यांचे नावें पत्र पाठविले त्याचीं नक्कल.

अजम नबाब हदैरअल्लीखां बाहादूर सलमहुताला साहेब मेहेरबान करम फर्माय मुखलिसान बाद इस्तियाक मुलाकात जाणून बहज्यत समाद मशहद जमीर इत्तीहाहत नवीरबाद येथील खैर सल्ला जाणून साहेबीं आपली खैर खुषी कलमीं करीत असिलें पाहिजे. दिगर, आं मेहेरबांकडून छ मोहरमचें खत आलें ते नेक वख्तीं पोंहचून खुषी व खुरमी जाली. नरसिंगराव वकील व येकलाह दस्तगाह कृष्णराव नारायण व सिंदे यांजकडील त्रिंबकराव व राव रास्ते यांजकडील गोविंदराव व गणपतराव पोहचून मुफसल मजमून मालूम जाला. श्रीमंतांकडील करारनामा व आपलें निभावणीचें खत मशारनिले यांनीं दाखविलें. त्यांत एक दोन कलमांची तकरार होती. सबब श्रीमंतांकडील पाठवण्याचा करारनामा व निभावणीचे पत्राचे मसविदे मशारनिले यांजपाशी दिल्हे. त्याप्रमाणें करारनामा व खतें येऊन पोंचतांच सावकाराकडे पैसे पोंचवीत असों. आणि इंग्रजाकडील मोहिमेस कूच करून जात असों. आज दोन सालांपासून चेनापटणकरांचा दोस्ती करण्याचा इरादा. एक पालखी व दाहा जवानांनसीं येण्यास अर्जू. लेकीन, जात मकरी. त्यांची चाल खुषकींत न व्हावी. सबव श्रीमंतांसीं सलुख केला. आम्ही चेनापटणाकडे गुंतल्यावर इंग्रज साष्टी जंबुसर वगैरे मकाने घेऊन मुद्देमाफक कबूल करतील. त्यास इ. कडलि मसलत व इतक्याखेरीज सलूख न करावा म्हणोन आंसाहेबीं कलमीं केलें, चुनाचे आंमेहरवांकडील नरसिंगराब वकील श्रीमंत खुदावंत न्यायत यांचे हुजूर असतां सलुखाचा सवाल जबाव करू लागले. ते वख्तीं सरकारांतून करार करण्याचे कलमांची याद लेहून दिल्ही कीं, हे पटनास नवाबबहादूर यांजकडे पाठवावी. त्यावरून मशारनिले यांनीं याद रवाना केली. त्या पैकीं आंसाहेबीं बंगल्यास फौज पाठवण्याचे वगैरे एक दोन कलमें बाद घालून आपणाकडून दुसरीं बाद कबूल करून पाठविली. त्या यादीबरहुकूम करारनामा सरकारांतून ठरविला. एक आदवानी वगैरेस इजा न द्यावी इतकें कलम जास्त. वरकड आंसाहेबीं कबूल केल्या बमोजिब कलमें असतां, हालीं दुसरा मसावदा ठरावून पाठविंला, यांत व त्यांत तफावत भारीच आहे. तेव्हां कराशिवाय नवी गोष्ट जाली. सरकारचे वचनाची कायमी कशी हें आइंदे जहुरांत येईल. एकवख्ती सलूख व सफाई जाली, त्याबरहुकूम निभावणींत यावें हे सरकारची खेश आहे. आणि ज्या दौलतींत आहादशर्त व वचनाची मजबुती तेच दौलत कायम व खजानाही तोच जाणावा. दौलत आहे तेथें आमदही आहे व खिसाराही आहे. लेकीन, करारांत अंतर इकडून येणार नाहीं. श्रीमंत खुदावंत न्यामत व नबाब बहादुर यांची दोस्ती व पक्का सलूख जाहला. याचा लौकिक बहुत जाला. त्यांत झुंजकामावर नजर राखणें हें। खानदानास व उमदेपणास लाजम नाहीं, ऐसें मदारुलमाहाम यांणी दिलांत आणोन आंमेहेरबांनीं मसविदे पाठविले. त्याबरहुकूम करारनामा व निभावणीचीं खतें पाठविलीं आहेत. राव मेहेरबां महादजीराव शिंदे फौजेसह गुजराथ प्रांतीं दरकुच गेलें. त्याजकडून निभावणीचे खत येणें. सबब मसविदा मुजरत त्यांजकडे रवाना केला. जलदच येईल. बाद आंसाहेबांकडे रवाना होईल, अवलचे करारास व हाल्लींचे करारास तफावत बहुत आहे. सरकारांतही पांच साहा सालांचा खिसारा. आपली दोस्ती व भाईचारा जाला. तेव्हां इकडील खिसारीयाची फिकीर आंसाहेबांस आहेच. ऐसें मदारुलमाहाम याणीं दिलांत आणोन तफावतीचे कलमांचा येख्त्यार आंसाहेबांवर व्हा, आपण लाजम तेच करतील. कराराप्रमाणे पैक्याचा भरणा आसाहेब करतीलच. सरकारांत खिसारा, मसलत भारी, सबब आपल्याशी कांहीं बोलयाविश रावमेहेरवान कृष्णराव यांस कलमी केले आहे. त्या बमोजीब अमनांत यावें. आजीबात चेनापट्टणाकडे जाण्यास दिवसगत न लागावी. अरसा तहत कमी राहिला. इंग्रजांची जात बेइमान. दक्षणचा दाइया ठेऊन न होण्याचे मनसबे बांधितात. व खूब मकरही जाणितात. आंसाहेबांकडे पटणास येण्याचें राज्यकारण तसेंच कर्नेल गाडर सुरतकर यांची पुणियास येण्याची आर्जु. लेकीन, त्यांचे चालीचा नक्ष पक्का समजोन साफ जाब मदारुल माहाम यांणीं दिल्हा. साष्टी जंबूसर वगैरे देऊन बजीदी केल्यास सरकारांतून इंग्रजांचा अर्ज ऐकणें, हें होवायाचें नाहीं. येविशीं खातरजमा असावी. आंसाहेबही खूब त्यांचे मकरास वाकफ. राज्यकारण न ऐकतां कायमीनें तंवीच अमलांत यावी. जें होणें तें तर फैनच्या इतल्यानें व सलाहतदबिरीनें व्हावें. एकासी गोड बोलून, एकास जक द्यावी, फोडाफोड करावी, हे हुन्नर टोपीकर बहुत जाणतात. या भुलथापीवर न जावें. बाजे मरातव राव मेहेरबान कृष्णराव यांस कलमीं केलें त्यावरून वाजे होईल. हामेश खत पाठवून दोस्तदार यांची खुषी करीत जावी.