Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)

पत्रांक २३१

श्री.
१७०१ आश्विन वद्य २
पौ मिती कार्तिक शुद्ध ८ मंगळवार.

श्रीमंत राजश्री बाळाजी नाईक नाना स्वामींचे सेवेसीं:-

सेवक गोविंद गोपाळ कृतानेक सां नमस्कार विनंती. येथील कुशल ता छ १६ माहे सवाल जाणून स्वकीयें कुशल लिहित असिलें पाहिजे. विशेष. आपण पत्र बारागिराबराबर पाठविलीं तीं पावलीं. सविस्तर अर्थ अवगत जाहाले. इकडील मजकूर तरी सुरतेहून पेशजीं राजाराम गोविंद नर्मदा उतरून इकडील आले होते. त्यास येथून सरंजाम रवाना केला. तेव्हां त्यास इकडील ताण वसला आण त्याचे सिवदीनेंही गवगवा केलाच होता. यामुळे मड़े सारे सोडून रात्री पळून माळवियांत गेले. हे पेशजी आपणांस लिाचे आहे. त्यावर छ ११ सवाली राजश्री चंदरराव पवार इंग्रजांचे परवानगीनें नर्मदा उतरून अलीकडे आले. त्याजवरी येथून सरंजाम पाठविला आहे. याची व आपले सरंजामाची गांठही पडली आहे. त्याचें पारिपत्य करावें. याचे अगाध नाहीं. परंतु मागील पिछा भारी, व सरकारांत तह काय ठरता तेंही कळलें पाहिजे. एकवेळ बिघाड जाहलियावरी पुर्तीच कंबरबंदी केली पाहिजे. यास्तव युक्तीचेच वाटेनें भय दाखऊन बंदोबस्त करवितों, तत्रापही बिघडलेंच तरी उपाय काय ? येविसींचे तपसीलें श्रीमंत राजश्री यजमानांनीं आपणांस व सरकारांत लिा आहे त्यावरून ध्यानांत येईल. ऐवजाकरितां वरचेवर लिहिलें. त्यास, प्रांतांतून अगर कोठून सोये होऊन येणें कळतच आहे. कर्जवाम घेऊन कांहीं सोये काढावी. तरी प्रथम राजाराम गोविंद याची गडबड जाली व अलीकडे चंद्रराव पवार याची गडबड यामुळें कांहीं एक घडों न आलें. प्रस्तुत तरतूद करीत असों. तरतूद करून रवानगी करितों. आम्हांस रात्रंदिवस आपलेकडील लक्ष राहून, खरेपणांत पडावें हाच निजध्यास. परंतु एक एक नवेंच विघ्न उभे राहते ! त्यास उपाय काय करावा ? त्यांतही तजवीज करून मागाहून पा आहे. प्रजन्य गेला. यामुळे प्रांतांत हाहाकार होऊन लोक तमाम उठोन मुलूख उजाड जाला व जलचरांचे खूळ. यामुळे कोणी सावकार कामास धजत नाहीं. येणेकरून जे करावयास जावें तें सिद्धीस जात नाहीं. आमचे प्रेत्ने एक दिवस अगोदर घडोन येईल ते करून पाठवीत आहे. यांत अंतर होणार नाहीं. खातरनिशा असे द्यावी व येविशींची निशा राजश्री बाळाजीपंत यांणी केलीच असेल, वरकड सविस्तर मानिल्हे याचे पत्रावरून कळेल. बहुत काय लि. हिणे ? कृपालेभ कीजे हे विज्ञप्ति.