Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक. २३८
श्री.
१७०१ आश्विन वद्य १४
श्रीमंत राजश्री बाळाजीनाईकनाना स्वामीचे सेवेसीं:-
सेवक गोविंद गोपाळ सा नमस्कार विनंति येथील कुशल ता अश्विन वद्य १४ मुा लष्कर व्यासेश्वर नजीक जाणून यथास्थित असे. विशेष. बहुत दिवस पत्र येऊन वर्तमान कळत नाहीं. आज पंधरा रोज. त्यास वरचेवर पत्र पाठऊन परामर्ष करीत जावें. यानंतर आपण मल्हारजी फडके यांजबर पत्र पाठविलें तें पावलें. पत्र आज्ञा कीं, त्याचा हिशेब पाहून पुन्हां यांसच पाटऊन देणें. तेथील कामाचे हेच उपयोगी ह्मणोन आज्ञा. त्याज वरून त्यांचा हिशेबाचा मागील फडशा करून, पुढील बंदोबस्त यांजकडे सांगोन पा आहे. तरी तेथील सर्व बंदोबस्त करून द्यावयाचा तो आपण करून द्यावा. वरकड इकडील मजकुर पेशजी कासीदा समागमें लिहिला आहे. व रा बाळ ठाकूर जाऊन पोंहचलेच असतील. त्यांचे जबानीवरून ध्यानास येईल. सारांश यंदाचें वर्ष कठिण आलें आहे. यांत ईश्वर अबरू राखील तर व आपली कृपा पूर्ण, नाहीं तर कळतच आहे. तूर्त येथील प्रसंग बहुत विलक्षण. यांत करतांही न करतांही दोष. चहूंकडून संकट. असो. जे काळीं जें घडावयाचे तें तों ईश्वरसतेनें घडतें. परंतु निमित्य मात्र येते. असो. आपणास कोणते समईं कोणी आह्मांविशीं विकल्पाची गोष्ट भासवील ते मात्र आपण ध्यानांत न आणावी. आह्मीं येथें ते आपणच आहां ऐसें समजोन, जें काम मसलत लहान मोठी करणें ते करावी. येविशींची खातरजमा शेवटपावेतों एकत्र रीतीची असों द्यावी. आमची निष्ठा चित्तापासून हेच आहे. यांत, अंतर कधींच पडावयाचें नाहीं. याजवर श्रीसत्ता ! परंतु निश्चय तों याप्रमाणें आहे. येथील सविस्तर मल्हार फडके जबानीं सांगतां कळों येईल. बहुत काय लिहिणें ? कृपालोभ करावा हे विज्ञप्ति.