Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)

पत्रांक. २३९

श्रीसांव.
१७०१ कार्तिक शुद्ध १ नंतर.
पौ कार्तिक वद्य ४ शनवार रात्रौ.

शेवेसी सां नमस्कार विनंती उपरी. आपली आज्ञा घेऊन स्वार जहालों, ते सोमवारीं दोन प्रहरां लष्करांत सुखरूप पावलों. त्या ग्रहस्थाची रात्रीस भेट जाहली. राजश्री चिमणाजी पंत येथें नव्हते. प्रतिपदेस आले. त्यांची आमची भेट होऊन मजकूर ध्यानास आला. या मजकुरांत कांहीं जीव नाहीं. मनस्वी जाबसाल. तुम्हांस पूर्वी लिहिला होता. त्या प्रों आहे. आपल्या ग्रहस्थाची व मुख्याची भेट जाहली. कार्याचा खुलासा समजला. त्याचा तपसील तेथील पत्रें आलीं होतीं त्यांजवरून शिलेदाराचे हवाला गृहस्थ केले, तुम्हीं जाणा, व हे जाणा ऐसे लौकिकांत जहाले, आंतून जावसाल, तुम्हीं आपला पैका घेणें, कोणाचें भय न धरणें, ऐसा खुलासा समजल्यानंतर आपल्या गृहस्थाकडून शिलेदाराकडे जाबसाल लावला आहे. त्याजवरून रा नकारनामकास उपद्रव बहुत जाहला होता तो शम करविला आहे. शिलेदाराचे मते, आमचा पैका द्यावा. त्यास, आम्हीं उत्तर केलें की शाई शिरस्तप्रों पैका देउं. ऐसें बोलल्यानंतर, त्यांतहि सोय पडत नाहीं. त्याचे हजार राऊत दुसाला चाकरी आणि पावती चाळीस हजार रुपये बहात्तर हजारांच्या चिठ्या सावकारावरे आहेत. त्याही बजिन्नस चिठ्या त्याजपाशी आहेत. चिठ्या पो कांहीं रुपाया पावला आहे. त्याचा कारकून रा नारोपंत नांदुरकर चिमणाजीपंताचे विद्यमानें आम्हांस भेटले. येथील प्रकार ऐसा आहे. मुख्याकडील जाबसाल तर परिछिन्न शिलेदाराचें नांव घेत नाहीं. तुह्मी जाणत व शिलेदार जाणत, ऐसें स्पष्ट उत्तर जाहलें, मुख्याचा जाबसाल शोध करतां गांवचे गांव सुरक्षित चालवावे व मुख्याचा व दरबार खर्च सव्वालक्ष पर्यंत पडतील, आणि गृहस्थाची मुक्तता होईल. परंतु शिलेदाराचा जाबसाल राहतो, जहालें वर्तमान सेवेसीं लिहिलें आहे. शिलेदाराचा जाबसाल हिशेब देणें. शाईशिरस्तेप्रों पुढें वर्तणूक करूं, आह्यांस ज्या गृहस्थाकडे पाठविला त्याचा मनसबा की, शिलेदाराची तोड पाडावी. हें खरें. यास कारण मुख्याचा जाबसालाचा विश्वास पटत नाहीं. याला कारण बकारनामक याजकडे अकार नामकाचे ग्रहस्थांनीं पक्का जाबसाल केला आहे कीं नारोबाची सुटका न होय ऐसें पक्केपणें कित्तेक जाबसाल त्यांनी पक्के करून घेतले आहेत. या अर्थी मुख्याचा जाबसालाचा भरंवसा नाहीं. सविस्तर अर्थ ध्यानास आणून उत्तर लिहावें, व रावसाहेब भास्करपंतांस खर्चाविशीं त्यांनी चिठी लिहिली आहे, त्याप्रों त्यांची बेगमी करावी. बहुत काय लिहिणें ? कृपा लोभ असों द्यावा. हे विनंती.