Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक २३२
श्री
१७०१ आश्विन वद्य २
पुा राजश्री बाळाजीनाईकनाना गोसावी यांसीः-
विनंति उपरी. राजश्री रामचंद्र पवार डभई परगण्यांत येऊन मुकाम करून राहिले होते. परगणा जप्त करावा, पैका मिळऊन पुढें अमदाबादेची जप्ती करावी, ऐसे मोठ्या उमेदीनें आले होते. त्यास, येथून फौजा पाठविल्याच होत्या. आह्मींही फौजसुधां पाठीवर मुकाम केला. आपलेकडील लोक वरचेवर रवाना जाहले. पारपत्य यथास्थित करावयाचें केलें. त्यास, त्याज, कडील बोलणें लागलें कीं, आपल्यास बाहादारी दिल्हियास निघोन जाऊं, ऐसे बोलूं लागले. उपरांत बहादारी दिल्ही की, तूर्त बिघाड न करणें. एक वेळ बिघाड जालीया मग आपले हातीं राहणार नाही, आणि सरकारचा शब्द लागेल जे तहरहाचा जाबसाल ठरत असतां यांणीं बिघाड केला. यास्तव मारनिलेस जाऊं दिल्हें. परंतु मोठ्या उमेदीनें माघारे गेले आहेत. आम्हांस बहुत जरबेनें पत्रें लिहिलीं आहेत. परंतु पुढें होणार तें होईल. आमची निष्ठा श्रीमंतांसी दुसरी नाहीं. इंग्रजांशी तहाची अगर बिघाडाची बातमी राखून वरचेवर आम्हांकडे लिहून पाठवीत जावें. यासीं आम्हांसीं नित्य संबंध पडला आहे. द्रोहींकडून संकट, उपाय नाहीं. ऐवजाविसीं आपण वरशेवर लिहितात. येथें एखादी तरतृद करावी. त्यास दिवसास एक नवें खूळ उभें राहतें. कोणी सावकार उभा राहत नाहीं. कोणास भरंवसाच पडत नाहीं. यांत कांहीं सोय पाहून तरतूद घडेल ती मागाहून करून पा. आपण वरवर लिहितात आण आमचे ध्यानांत नाहीं, ऐसें नाही. परंतु उपाय काय करावा ? वरकड सविस्तर मागाहून लिहून पा. रा छ १६ माहे सवाल बहुत काय लिहिणें ? लोभ करावा हे विनंति. मोर्तबसुद.