मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)

पत्रांक २३३

श्री.
१७०१ आश्विन वद्य २

पुा राजश्री बाळाज्ञीनाईकनाना गोसावी यांसी.-

विनंति उपरी. सचिण सत्रागांव व फुटगांव राजश्री सखारामपंत बापू यांचे सरंजामांत पेशजी आपलेकडून दिले होते. व गल्हेमरोळी राजश्री नानाकडे कर्जात दिल्ही होती. त्यास, सरकारठाणीं तेथें होतीं. उपरांत राजश्री दादासाहेब सुरतप्रांतीं आलियावरी सरकारचे महाल इंग्रजानें जप्त केले होते. ते समयीं हेही महाल जप्तींत आले होते. तेव्हां आपलेकडील कमावीसदारांनी इंग्रजास समजाविलें की, हे महाल आह्मांकडील आहेत. सत्रागांव बापूकडे अंतस्तांत दिले होते. अखेरसालपर्यंत द्यावयाचा करार होता. त्यास, अखेरसाल मागेंच होऊन गेलें. आतां त्याजकडे महाल द्यावयाचें कारण नाहीं. तरी आमचे महाल सोडून देवावे. त्याजवरून महाल इंग्रजानें पक्केपणे बोलून सोडून दिलें, उपरांत सरकारचा अंमल पुन्हां सुरतप्रांतीं बसला. त्यावरी महाल सरकारांत द्यावें. त्यास, गल्हे व मरोळी हे दोन्ही महाल नानांकडे. तेथील कमावीसदारांचीं पत्रें व कारकून येथें आले. सविस्तर वर्तमान सांगितले कीं, महाल नानांकडे द्यावे. त्यावरून राजश्री अण्णाजी अनंत यांस पत्रें देऊन नानाकडील ठाणीं बसविलीं. हें वर्तमान इंग्रजांस कळलियावरी आह्मांकडील कमावीसदारांस ह्मणों लागले कीं, तुम्ही आमाण बोलून महाल सोडवून घेतले याचें कारण काय ? आम्ही तुमचे सारेच महाल जप्त करू असें बहुत दोष ठेविले. तेथें समज किती हें ध्यानांतच आहे! तेव्हां संकट जाणून पुन्हा आपलेकडोन महाल जप्त केले आहेत. याप्रमाणें मजकूर आहे. या वरी सरकारचीं व नानाचीं पत्रें शब्द लाऊन आलीं. त्यांचीं उत्तरें काय द्यावीं, येविसींचे राजश्री हरीपंततात्यास राजश्री बाळाजी महादेव यांनीं लिहिलें आहे. त्यावरून ध्यानांत येईल. येविसींचे सविस्तर आपणांस लिा आहे, म्हणोन सरकारांत लिा आहे. तरी सविस्तर समजावून ध्यानांत आणावें. आपलेकडून कांहीं एक गुंता नाहीं. गोष्ट कुपेचीं पडली आहे. रा छ १६ माहे सवाल. बहुत काय लिहिणें ? लोभ कोजे. हे विनंति. मोर्तबसुद,

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries