मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)

पत्रांक २२८

श्री.
१७०१ आश्विन शुद्ध १.

पुा श्रीमंत राजश्री बाळाजी नाईक नाना स्वामीचे सेवेसी:-

सां नमस्कार विनंती. आपण श्रावण वद्य त्रितियेचीं पत्रें पाठविलीं तीं पत्रें आह्मांकडे यावीं तीं न येतां राजश्री बापूजीपंतांकडे गेली. त्यांनीं पत्रें फोडून पाहून आह्मांकडे पाठविलीं तीं छ २३ रमजानीं आम्हांस पावली. फार दिवस पत्रांस लागले, याचें कारण कांहींच समजत नाहीं. पत्रांतील मजकूर कीं, यत्न शेवटास गेला, त्यास हें कर्म करावयाची उतावळी किमर्थ केली, सरकारचें काम थोडें बहुत निदर्शनास आणावें, ग्रामाकडील बंदोबस्त व्हावा, आपली आज्ञा यावी, तेव्हां घडावें, हें तुह्मी करणार नाहीं, परभारें जाले किंवा काय तें समजलियांत आलें नाहीं, ह्मणून या पर्यायें लिहिलें. त्यास, येविशींचे तपशील पाहिलेच लिा आहेत, त्यावरून समजलियांत आलेंच असेल. राजश्री राघोपंत पाठविले ह्मणोन लिहिलें. त्यांचें येणें न जालें. दुसरें, गोपाळराव यांस परभारें पत्रें दिल्हीं ह्मणोन लिा. त्यास, त्याचा पर्याय पुरवणी पत्रीं लिा आहे. व बाळ ठाकूर सांगतां ध्यानात येईल. इकडून अंतर किमपि पडावयाचें नाहीं. श्रीमंत राजश्री नानांस व श्रीमंत राजश्री तात्यांस पत्रें पाठवावीं कीं, गोपाळ यास काम न द्यावें. त्यास आह्मीं कांहींच चिठी पत्रीं दिल्ही नाहीं व यजमानानींही दिल्ही नाही. तेव्हां, उगेच त्यांस काय ह्मणोन ल्याहावें ? तत्रापि, पाहिजे तर पाठऊन द्यावयास येईल. बहुत काय लिहिणें? कृपालोभ कीजे हे विनंती.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries