Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)

पत्रांक २०१.

श्री.
( नकल) १७०० माघ वद्य ३.

करार जाबता शपतपूर्वक राजश्री दादासाहेब यांचाः-

राजश्री माधवराव नारायण पंत प्रधान यांणीं विद्यमान राजश्री तुकोजी होळकर व माहादजी शिंदे सुा तिसा सबैन मया व अलफ. तुह्मांआह्मांशी नानाप्रकारें विग्रह राज्यलोभास्तव वाढोन आह्मीं दौलत साधावी यास्तव प्रयत्न बहुत केला. इंग्रजांकडे जाऊन त्यास साह्य करून बरोबर घेऊन इंदुरीतळेगांवपर्यंत आलों, परस्परें लढाईचा प्रसंग घडला. अंदेशा पाहतां आपण राज्यलोभाविष्ट झाल्यानें इंग्रजांकडे दौलत जाती असें जाणून उभयतां सरदारांकडे आलों. सरदारांनी खर्चाची बेगमी करून देतों आणि स्नानसंध्या करून स्वस्थ राहावें असें सांगितलें. त्याप्रमाणें मान्य करून खर्चाची बेगमी अलाहिदा नेमणुकंप्रमाणे नक्की बारा लक्षांची जागा लाऊन दिली. ती आपण घेऊन, स्नानसंध्या करून, झांशीस राहून, राज्याचा लोभ धरून दौलतीचा वारसा करणार नाहीं, व दौलतीस वांकडे पडे असें आचरण आह्मां पासून होणार नाही. नेमणूक करून दिल्ही त्यांत सत्कालक्षेप करून स्वस्थ राहूं. तुह्मीं पंतप्रधान राज्याचे धणी व चिरंजीव बाजीराव रघुनाथ तुमचे कारभारी करून द्यावे, असें उभयतां सरदारांचे व आमचे विचारें ठरून, आह्मीं मान्य झालों. तुह्मीं व चिरंजीव बाजीराव यांणी तीर्थरूप कैलासवासी नानासाहेब व भाऊसाहेब धणी व कारभारी या अन्वयें वर्तत होते त्याप्रमाणें प्रबुद्धपण आलियावर परस्परें वर्तावें. स्वामीसेवकधर्म उभयतांनीं अन्योन्य नि:कपटपणें चालवावा. धणीपणाची व कारभाराची पुस्तपन्हा तुह्मीं उभयतांची उभयतां सरदार करितील. आह्मीं या दौलतसंबंधीं कारभाराच्या प्रकरणांत एकंदर मन घालणार नाही. वर्तणुकेच्या कलमबंदीची याद अलाहिदा लिहून दिली आहे त्याप्रमाणें आचरण करू. उभयतां सरदारांचे विद्यमानें परस्परें करार ठरले आहेत, त्याप्रमाणें तुह्मांकडून अमलांत यावें. आह्मांकडूनहि अमलांत येईल. यांत अंतर करूं तर श्रीसांबाची व गंगाभागीरथीची शपत असे. जाणिजे छ १५ माहे मोहरम, सुा तिसा सबैन मया व अलफ, मुकाम इंदुरी तळेगांव.