Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

महिकावती (माहिम)ची बखर

हरदपुरो अधिकारि म्हणे मै बडा ॥ हें आईकोन खानसाहेबासिं अजब वाटलें ।। आगासिचे वर्तक जानीक सावा व अर्जुन सावा आपलिं खतें दाखवों लागले ।। जर यावत् महिकावति व वसई आमचा हवाला ।। पहिला विडा पहिला मान आमचा ॥ या उपर हरदपुरो अधिकारि बोलिला ।। आपला मझर खानास दाखविला ॥ जर माहिम बिंबस्थान राणे पै आमचा जन्म व चवदा माहालें माहिमा खाली माहिम बडा ॥ ऐसा मझर खाने पाहातां निवाडा केला जर माहिम बडा ।। हुजुर मजलसि दफतर पाहातां, जील्हे कागद पाहाता, निवाडा राजीणि सीक्के तलबे सिक्के माहिम, कसबे सिक्के माहिम, प्रगाण सिक्के माहिम, ऐसा मझर पाहिला ।। तेधवां खान म्हणे माहिम बडा ।। मग हरदपुरो अधिकारि यासिं राणे पैकि आगरतपे-याचा विडा हरदपुरोसिं दीधला ।। आतां खान म्हणे कोण्हाला ॥ अधिकारि बोलिला राजतपे- याचा ॥ पोस पुरो वानठेकर त्याला दिधला ॥ त्या उपर खान म्हणे आता कोणाला ॥ तवं मालाडतपेयाला व मरोळतपेयाला ।। दोघां देसायांला विडे दिधले ।। मग वसईचा वर्तक नागचुरी त्यासी विडा दिधला ॥ मग आगासिचे वर्तक अर्जुन सावा व नामसवा त्यासी विडे दिधले ।। तेधवां चु-याचे पुर्वपक्ष हरदपुरो अधिकारि बोलता जाला ।। खानसाहेबा प्रत सांगता जाला ।। जर चुरि आद्य वर्तक ।। नामजा देसायाचि परंपरा ।। पुर्वि पातस्या सुलतान तोगिल त्याचा सुलतान आलावदिन दिल्लीचा पातस्याहि त्याचा वजिर कोकणि आला ।। नाम निका मलिक ।। पैठणा जवळ च-हीं गावं तेथोन जैतचुरि निका मलिकें आणिला ॥ तो विराळि मालाड पुर्व दिसेस तेथे स्थापिला ॥ विराळि पाखाडि मालाडची ईनाम दिधली ।। त्याचा पुत्र भागडचुरि गोत्र विश्वामित्र कुळस्वामिण हरबा देव ब्रम्हक्षोत्रे रुद्रउपाशक गुरु केशवपंत सांवखेडकर ।। त्याणे साशष्ट गावांचि देसलिक चालविली ।। सर्वाचा देसाये प्रवर्तला ॥ तेधवां कजिया येवोन बनला ।। मग तो भागडचुरि देसाये दादरुत आणि सीमल म्हातारा मीळोन तो भागडचुरि मारिला ॥ त्याचे पुतणे दोघे पैलपार जाले ॥ येवोन वसई राहिले ।। नामचुरि व भीवंचुरि ॥ हे या स्थळ वर्तकिचे आधिकारी ।। त्यासी टिळयाचा अधिकार ॥ त्या खालते रावराउत गोत्र अंबऋषि कुळदेवत येकविरा ।। या उपर म्हातारे सवे घरथ आणि ईतर ॥ आतां चु-याचा वंश ।। नामचुरी १ ।। त्याचा गोविंदचुरी २ ।। माधवचुरी ३ ॥ गोपाळचुरी ४॥ रामचुरी ५॥ सीवचुरी ६ ॥ दादचुरी ७ ॥ कृष्णचुरी ८ ॥ केशवचुरी ९ ।। मुकुंदचुरी १० ।। रणसोडचुरी ११ ॥ विठलचुरी १२ ।। हे वर्तक नाम जादे ।। विठलचुरी घरथाळयान बुलभाट यावत् बोरवाडी घर बांधोन राहिला ।। त्याचा निजांग पुतण्या आगासि देववाडि वर्तला ॥ त्याचा वंश ॥ रामचुरी १ ।। त्याचा गोविंदचुरी २ ॥ त्याचा दामुलचुरी ३ ॥ त्याचा सीवरामचुरी ४ ।। त्याचा वंशा न वाढे म्हणोन सीवरामचुरि केळव्या गेला ॥ त्याचा वंश केळव्यासिं जाला ।। तो हाटवटा हांटदळि राहिला ॥ त्याचा वंश तेथोन ॥ आणि या नागचु-याधि कंन्या साव्याचे घरिं दिधली होती ॥ त्या कंन्ये पासोन धोत्तरवंश म्हणोन आपुले वर्तकि पद आगासिचें त्या देवदत्त सव्यासी दीधलें ॥ त्यासि वर्तकि पद चालतें जालें ।। त्या पासोन सीवाजी सव्याचा पुत्र गोविंद सवा ।। तो द्रव्यमदे दिमाक थोरावला ।। दिवानि येणे जाणे न्यायासिं ।। त्या वेगळे आमानता सर्वांसी ।। तेधवां याणे अतिसयें पाये सोडिले ।। लोक त्याणे फार दमिले ॥ तेधवां आमचे पुरोपक्षिं अमान्यता करो लागला ॥ तेधवां पुरो आगासकर वि-हारकर सोपारकर हे मिळोन शोध चु-याचा केला ।। तेधवां चु-याचा वंशिक भीवंचु-याचा नातु केळ. व्यास होता तो या पुरो हि आपण मनुष्य धाडोन त्यास आणिलें ।। त्या जवंळ हेर घेतली ।। जर तुज कांहीं विदित आहे जर तुझे वाड वर्तक होउन गेले त्यांचे हातिचें खत अथवा काहि पत्र असेल तर आह्मि तुज वर्तकि या देसाचि देवों ॥ तेधवां तो बोलता जाला ।। जे पुर्विचा मझर निका मलिकाचे हातिचा आहे तो आणितों ।। तेधवां विठलचुरी केळव्यास जावोन मझर आणिला ।। सहि किताब घेतला ।। या सर्वांचे चित्तास आला ॥ मग त्या विठलचु-यासिं घेवोन दिवानि रवानसाहेंबा जवंळ आले ।। सलाम करोन उभे राहिले ।। जाब केला ।। जर हा विठलचुरी वर्तक आदखानि ॥ याचि हि वर्तकी हा सवा चालवितो ।। हें सत्य असत्य पाहावें ॥ जर कवणाचि हि वर्तकी खती मझरीं पाहावी ॥ या जाबा खान पुसतां जाला जर कोण्हाचि हि वर्तकी हें साकल्य सांगावें ॥ खतीं मझरि दाखवावीं ॥ मग या बोला जाब विठलचुरीयान केला जर आदखानि वर्तक चुरि म्हणोन मझर दाखविला साहेबि नेकी पाहावी ॥ मग खाने मझर वाचविला ।। तेधवां खत चु-याचे नावें, किताबत शिका पातस्याहि, सुलतान आलावदिन, सीका वसई चुरी आदखानि वर्तक सही ।। तें देखोन खान सव्या जवंळ विचारों लागला ॥ जर तु जवंळ खत मझर असेल तर दाखवावा ।। तेधवां सवा बोलिला जर ही वर्तांके चु-याची हें सत्य, परंतु आह्मि चु-याचे नातु अवलाद ह्मणोन आज्यान आाह्मास दीधली ।। अवलाद ह्मणोन चालवितों ॥ तेधवां खान बोलिला जर त्याचा वंशिक असता तुज वर्तकि न पावे, जेधषां त्याचे कोण्हि नसतें तेधवां चालती ।। मग खाने चुरि नावाजिला ।। आपल्या पासि ठेविला ॥ व सव्यासि बोलिला जर चौघलें पद चालवावें ।। ह्मणोन खाने सव्यासि चौधला केलें ।। खत आपले हातिचें दोधलें ।। तो हि सुखि केला ।। मग त्या चु-यासि निराश्रय जाणोन घर घरथा व वाडि ईनाम यावत् रान मुक्तेश्वर रेणुकास्थान ईनाम दीधलें ।। तो घरथाळयास स्थापिला ।। या परि चुरि वर्तक जाला ।। दिवानि दीमक जाला ।। सवा तो हि वर्ती लागला ।। त्या चु-यासि कंन्या नामराउतें दीधलि ।। तो चुरि आणि राउत हे सोहिरे जाले ॥ राउत गोत्र अंबऋषि कुळस्वामिण येकविरा ।। या राउतास सोहिरा घरथ गोत्र श्रीचंद कुळस्वामिण काळिका ।। यैसे वतों लागल ।। यैसा निवाडा बहादुरस्या जवंळ हरदपुरो अधिकारियान सांगितला ॥ तो खानसाहेबासिं मानला । मग त्या चु-यासी सिरपाव दिला । अधिकारि देसायें चौघले पहिराविले ।। सर्वांसि आज्ञा दिधली ।। सर्व देसाय गावोंगाविं गेले ।। मग बहादुस्याने राज्य वसई केलें वरुषें ३५ ॥ या उपरांत कथा वर्तलि सही ॥ छ ।।