Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

महिकावती (माहिम)ची बखर

तेथोन वाळुकेश्वरि गेला ।। मुख्य प्रधानासि भेटला । तेथोन मग विचार केला ॥ जे येथे लोक भले आणावे ।। देश वसवावा ।। ऐसा विचार केला ।। मग पत्र अहिनळवाडा पाटणि ।। व पैठणि लीहिली ॥ जर हा देश उत्तम स्थळ जाणोन रहित पंचाइत पाठवावी व चीरंजीव बिंबदेवास पाठवावें ।। मुजा देश वसवावा ।। म्हणोन पत्रें प्रविष्ट पैठणिं जाली ।। तेथोन अहिनळवाडा पाटणि पत्रें प्रविष्ट जालीं ॥ राया गोवर्धनबिंबा प्रति पावलीं ।। वाचुन अभिप्राव मनास आणिला ।। मग बिंबदेवा प्रती निरोप दिधला ।। तेघवा बिंबदेवाचे समागमौ कुळे ६६ देवोन रवाना केला ।। तीं कुळें कोण कोण ।। सोमवंशी कुळे २७ सूर्यवंशि कुळे १२ शेष वंशि कुळें ९ आणि पंचाळकुळें ५ मनुमाया २ सीलीक ३ त्राठक ४ देवाज्ञ ५ घोडेलकुळे ७ गुर्जरवैस्यकुळे ६ लाड १ दशालाड २ वीसालाड ३ मोड १ दसामोड २ विसामोड येवं अवघिं कुळें ६६ राजा बिंब घेवोन पैठणि आला ॥ आणि पैठणा होउन ।। राया समागमे ब्राह्मणसमुदाय यजुर्वेदि माध्यानदिन भेद वाजस्निशाखेचे ।। शास्त्रधारि वैदिकः पंडित: आचार्य उपाघ्येः जोतिर्विदाख्यः प्रोहितः नाइकः हा समुदाय राया समागमे पैठणा होऊन मुख्य गंगाधर नायक सांवखेडकर गोत्र पौतमाक्ष त्रिप्रवर ।। कुळस्वामिण यकविश ।। सेनादिपत्य मेघडंबर सुर्यापान ।। वीरगांठ हा राज्य मान्य ।। व कुळगुरुत्व सिंधे शेषवंशिकाचे जाणुन सहकुटुंबि ।। व विश्वनाथपंत कांबळे राजप्रोहित ।। भास्कर पंडित चामरे ।। गोवर्धनाचार्य देवधर प्रधान ।। अनंत नायक छत्रे ।। केशवराम घोडे ।। ईत्यादिक मोगरे।। जाधवे:हेमटे ॥ हा देशस्तब्राह्मणसमुदाये ।। राया समागमि आला ।। यांस मुख्य ठिकाण ।। पसपवलि इनाम गंगाधर नायकांस।। विश्वनाथपंतास पाहाड ॥ यां संमतें सर्व वृति धरून दुजे गावोंगाविं राहावविलें ।। आपण ठाण्यास येऊन वालकेश्वरि रायास भेटला ।। उभयांस भेट जालि ।। आलिंगनवृत्ति संपादिली ।। स्वस्तिक्षेम पुसोन साषष्ट कुळे जीं आलिं ।। त्यांहीं राजा प्रणामिला ॥ व ब्राह्मणि आशिर्वाद संपादिला ।। जाणोन राजा फार संतोषला ।। मग दिवस ५ तेथे क्रमिले ।। मागे सर्व समुदाये आपण वाहिनळें राजण फरास उत्तम ॥ जागा जाणोन वसाइत केली ।। दुसरि वसाईति मरोळि खापणे ॥ माहाळजापुर ।। मालाड खापणे ।। नरसापुरिं हि करविली ॥ प्रधान येत समईं कान्हेरि योगेश्वरि ।। महाकाळभैरवि ठीकाण ॥ सिद्धाश्रम ॥ राया हे हि कौतुकें सांगितलीं ॥ तीं रायें दृष्टि अवलोकिली ॥ कान्हेरिस राज्यधाम जाणुन तेथे वस्ति केली ॥ समुदाये आपला तेथे मेळविला ।। देशा आलिया कुळास वृति दीधल्या ॥ सूर्यवंशि राज्यधामि भाहिमी स्थापिले ॥ शेषवंशि सिंधे कुळे ९ नव त्यासि चवघले व मुख्य करोन दिधले ।। धारापुरकर बाळकोजी १ व दुसरा विठोजी गव्हाणकर २ व तिसरा थेवखंडकर ३ व चवथा पाचघ-या ४॥ या उपरात सोमवंशि रखमाजिराव देशले २७ कुळाचे ।। व या खालते चौघले ॥ येशवंतराव प्रथम १ सिवाजीराव २ गोपाळराव ३ मुकुंदराव ४ हे मुख्य टिळ्या विड्या चे ।। यानंतर सूर्यवंशि कुळे १२ ॥ त्या मध्यें राजगोत्रि देसाये ।। चौघले दामोदर १ बाळसेन २ श्रीदत्त ३ लक्ष्मीधर ४ हे मुख्य टिळ्या विड्या चे ।। गुजर बखाल गावोंगावि दुकाने मांडाविं ॥ तीन संवत्सर मोफत दुकानास मसाला नाहि ॥ उदिमी सुकडा नाहिं ॥ हरदेशिचा उदिम आणावा ।। त्यास जखात नाहि ।। संवत्सर ३ ॥ मग बंदिस्त होईल ।। ऐसिं खतं राया बिंबाने दिधलीं ॥ तेधवां पटवर्धन उभे राहिले जर आह्मि येथिचे स्थळगुरु ।। आह्मास राजराजश्रीहि वृत्त आमचि आम्हास द्यावी ।। मग राजा बोलिला । तुमचि वृत काढि ऐसा कोण आहे ।। जी तुमचि वृत्त आहे ति तुह्मी सुखें खावी ।। गावे वसवावी ।। हे जे काहि नूतन आले आहेत आमचे समागमि त्यांचे हि मुळगुरु आले आहेत त्यासिं तुम्हासि तालुका काहि लागत नाहिं ।। ऐसा निवाडा जाला ।। गावोगाविं रहित स्थापिली ।। ब्राह्मण येजुर्वेदि पळसौलिग्राम वृति ईनाम दीधला ।। ते पळसौलिस राहिले ।। या नंतर रखमाजिराव मरोळखापण्यासिं स्थापिला ॥ हवाला माहालें दिधली ।। नव हजार सजगाणि वर्षास रायासी द्यावें ॥ त्याचे ताबिस गांव मरोळस्वापण्या खालीं ।। मुळगांव १ चाचाळे २ कालिणे ३ कुराळे ४ साहार ५ कोडिवटे ६ राजवोळ ७ परतापुर ८ दळगांव ९ मोरवोळ १० वरवसं ११ तुगवे १२ सांखळी १३ चेंदरली १४ कोपरी १५ पोंवै १६ साहि १७ पळसवलि १८ कोसिंबे १९ माहाळजास २० गोरखगांव २१ आरे २२ ही गांवें मरोळा खालि